सायकलस्वार सर्वाधिक आनंदी...

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

सायकलपेक्षा चारचाकीतून हिंडणाऱ्या व्यक्ती खूष असतात, असा एक समज असतो. मात्र इतर कुठल्याही वाहनांपेक्षा सायकलस्वार अधिक आनंदी असतात, असे एका नवीन संशोधनात समोर आले आहे.

अमेरिकेतील क्‍लेमन्स विद्यापीठातील संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. "टान्सपोर्टेशन' या जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी वाहतुकीची विविध साधने वापरून केल्या जाणाऱ्या प्रवासादरम्यानचा आनंद, ताण, दुःख अशा भावनांची तपासणी केली. सायकलस्वारांनंतर कारमधून प्रवास करणारे आनंदी असतात, असे दिसून आले.

बस आणि ट्रेनमधील प्रवाशांनी सर्वाधिक नकारात्मक भावना व्यक्त केल्या. अमेरिकन टाइम यूज सर्व्हेची माहिती वापरून संशोधकांनी विविध वाहनांवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या मूडची तपासणी केली.

""इतर कुठल्याही वाहनाच्या तुलनेत लोक सायकल चालवताना अधिक आनंदी न उत्साही असतात,'' असे क्‍लेमन्स महाविद्यालयातील नियोजन व विकास विभागातील सहप्राध्यापक एरिक मोरिस यांनी सांगितले. व्यायाम आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणाऱ्यांना आता हे "आनंदी' कारणही मिळाले आहे.

Web Title: Most happy cyclist ...