मूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा मस्ती करून सहलीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना रत्नदुर्ग माउंटेनियर्सतर्फे व्हॅली क्रॉसिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व ते त्यांनी स्वतःसुद्धा केले. समुद्रकिनारी खो-खो व फनी गेम्सचाही आस्वाद त्यांनी घेतला.

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मूकबधिर विद्यालयात आठ दिवसांचे हस्तकला व कौशल्य विकासाचे शिबिर घेण्यात येते. यंदा या शिबिराअंतर्गत एक दिवस निसर्गासोबत या संकल्पनेनुसार गणेशगुळे येथे गणपती मंदिर, प्राचीनकालीन विहिर विद्यार्थ्यांनी पाहिली. त्यानंतर व्हॅली क्रॉसिंगचे प्रात्यक्षिक झाले.

28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान होणार्‍या रत्नागिरीतील सर्वांत मोठ्या 900 फूट व्हॅली क्रॉसिंग इव्हेंटची पूर्वतयारी व पूर्वओळख मूकबधिर विद्यार्थ्यांना होण्याकरिता त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गणेश चौघुले आणि जितेंद्र शिंदे यांनी गंगाधर पटवर्धन यांच्या घराच्या आवारामध्ये अंदाजे 100 फूट लांबीचे व्हॅली क्रॉसिंगचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याकडून हे प्रात्यक्षिक करवून घेतले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा भरपूर आनंद लुटला व त्यांच्यामधील भीतीही दूर झाली. 28 एप्रिलला यातील विद्यार्थी व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवणार आहेत.

सहलीमधून आलेल्या विद्यार्थ्यांची भेट गणेशगुळ्याचे सरपंच संदीप शिंदे यांनी घेतली. या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच पुढील काळात गणेशगुळे गावात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता, सुशोभीकरण व उपक्रम चालू करायचे आहेत. याकरिता या विद्यार्थ्यांनी आपले कलात्मक योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. या सहलीकरिता फिनोलेक्स इंडस्ट्रीज, वाहनचालक श्री. भुते यांचे सहकार्य लाभले. सहलीवेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा ताटके, शिक्षक गजानन रजपूत, सीमा मुळ्ये, सौ. आगाशे मुलांसोबत होत्या.

Web Title: Ratnagiri News handicap students tour to Ganeshgule