शालेय साहित्याने हरखले ओझर्डेचे विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

या उपक्रमासाठी सकाळ सोशल फाउंडेशनचे विशेष सहकार्य मिळाल्याचे संयाेजकांनी नमूद केले.

सातारा : सकाळ सोशल फाउंडेशन, स्कॉ- कॅनडा सेवाभावी संस्था व रोटरी क्‍लब ऑफ शनिवार वाडा (पुणे) यांच्या वतीने ओझर्डे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या स्लीपिंग किट व शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

 
कार्यक्रमासाठी खास कॅनडा येथील स्कॉ- कॅनडा या सेवाभावी संस्थेचे सभासद उपस्थित होते. ओझर्डे येथील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या शालेय साहित्याचा लाभ मिळाला. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या उपक्रमासाठी सकाळ सोशल फाउंडेशनचे विशेष सहकार्य मिळाले.
 
ओझर्डे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजयसिंह पिसाळ, ग्रामस्थ, तसेच शालेय व्यवस्थापन समितीने या योगदानाबद्दल आभार मानले. कार्यक्रमास सकाळ सोशल फाउंडेशनचे व्यवस्थापक राहुल गरड, रोटरी क्‍लब ऑफ शनिवार वाडाच्या अध्यक्षा अनिता पाटील, वैभव पोरे, विशाल फरांदे, राजेंद्र कदम, प्रदीप पिसाळ, विजय बांदल, अण्णासाहेब फरांदे, सिकंदर पठाण, राजेंद्र निकम, भगवान धुमाळ, संजय पिसाळ, सुनील कदम, महादेव फरांदे, प्रभाकर दीक्षित, सागर राऊत, रमेश कदम, शिक्षिका सौ. दगडे, सौ. पवार, सौ. बेलोशे, सौ. सुतार आणि पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचा - या शहरात जन्मणारी मुलगी ठरणार लखपती

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी विजयसिंह पिसाळ, राहुल गरड, अनिता पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचे ओझर्डे ग्रामस्थांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty Needy Students At Ozorde Received School Material Worth Six Thousand Rupees Each