निवासी शाळा बनली मायेचा आधार

युवराज पाटील
शनिवार, 28 एप्रिल 2018

कोल्हापूर - अनाथ तसेच आई-वडील हयात नसलेल्या मुलींना गगनबावडा येथील निवासी शाळा मायेचा आधार ठरली आहे. या शाळेच्या प्रवेशक्षमतेत यंदा वाढ झाली आहे. सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावीसाठी प्रत्येकी ५० जागा शासनाने वाढवून दिल्या आहेत. दोन्ही वर्गांसाठी प्रत्येकी दीडशे अशी तीनशे इतकी प्रवेश क्षमता झाली आहे.

कोल्हापूर - अनाथ तसेच आई-वडील हयात नसलेल्या मुलींना गगनबावडा येथील निवासी शाळा मायेचा आधार ठरली आहे. या शाळेच्या प्रवेशक्षमतेत यंदा वाढ झाली आहे. सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावीसाठी प्रत्येकी ५० जागा शासनाने वाढवून दिल्या आहेत. दोन्ही वर्गांसाठी प्रत्येकी दीडशे अशी तीनशे इतकी प्रवेश क्षमता झाली आहे.

मुलींच्या प्राथमिक शिक्षणाची गरज ध्यानात घेऊन २००८ मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या नावाने शाळा सुरू झाली. गगनबावड्यासारख्या दुर्गम आणि पावसाचे प्रमाण 
मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाळेला प्रतिसाद मिळेल की 
नाही, याबाबत शंका होती. मात्र अनाथ, निराधार मुलींसाठी ही शाळा आधार ठरली. सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण आणि राहण्याचा सर्व खर्च शासनाचा असे शाळेचे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या काही वर्षांनंतर सध्या ही शाळा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये भरत आहे. गेल्या दहा वर्षांत याच शाळेतून ‘सावित्रीच्या लेकी’ घडल्या. जिल्हा परिषदेतर्फे ही शाळा चालविली जाते.

निवासी शाळा दहावीपर्यंत आहे. शासनाने यंदा ज्युनियर कॉलेजच्या प्रवेशाला मान्यता दिली आहे. संबंधित मुली कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यांच्या निवासाची सोय होस्टेलमध्ये होईल. २०१५ मध्ये केवळ १२१ इतकी प्रवेश क्षमता होती. आता १७० इतकी आहे. पालक मेळावे, शाळांत नेमक्‍या कोणत्या सुविधा दिल्या याची माहिती पालकापर्यंत पोचविल्याने प्रवेशात वाढ झाली आहे
- सुभाष चौगुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी

प्रवेशाचे निकष

 •  मुलगी शाळाबाह्य ठरल्यास
 •  अनुसूचित जाती व जमाती विमुक्त जाती, भटक्‍या जमाती व इतर, अल्पसंख्याक व इतर
 •  अनाथ पाल्य, आई-वडील हयात नसलेल्या मुली
 •  घटस्फोटित, परित्यक्ता 
 •  अपंग पालकांचे पाल्य
 •  नैसर्गिक आपत्तीग्रस्त कोणत्याही 
 • कारणास्तव शिक्षणापासून वंचित मुली

सुविधा 

 •  आंघोळीला गरम पाणी
 •  चविष्ट नाश्‍ता व सकस आहार 
 •  स्वतंत्र ग्रंथालय, संगणक कक्ष
 •  मोफत शालेय साहित्य
 •  मोफत गणवेश
 •  कला, क्रीडा, स्वसंरक्षण, व्यवसाय प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा, अन्य परीक्षांत संधी मार्गदर्शन वर्ग दहावी, बारावीसाठी विशेष नियोजन
Web Title: Kolhapur News Gaganbawada Residential School special