ऑक्‍सिजन सिलेंडरसाठी नवीन तंत्रज्ञान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

औद्योगिक क्षेत्रातही महिला आपले स्थान निर्माण करीत असताना, संगीता जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या ऑक्‍सिजन सिलेंडर पुरविण्याच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पिनॅकल इंडस्ट्रिज्‌ ही कंपनी सुरू केली असून यामाध्यमातून शहरातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटला याच कंपनीमार्फत ऑक्‍सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जातो. आपल्या या प्रवासाविषयी संगीता जाधव सांगताहेत... 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न हे स्त्रीच्या आयुष्यातील पहिली पायरी. त्यानंतरच इतर क्षेत्रांकडे तिला वळता येते. माझे पती अमोल जाधव हे औद्योगिक क्षेत्रामध्ये विशेषत: पेट्रोलियम क्षेत्रामध्ये आधीपासूनच कार्यरत असल्याने त्यांच्या त्या कारभारात मीही लक्ष देऊ लागले. वाणिज्य शाखेची पदवी असल्याने ती जबाबदारी पाहात असतानाच उद्योगही सांभाळू लागले. पिनॅकल इंडस्ट्रिजच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील हॉस्पिटल्सला ऑक्‍सिजन सिलेंडर पुरविणारी ही कंपनी. काही वर्षांपूर्वी 80 किलोचे एक सिलेंडर असायचे. यात साधारणपणे 50 किलो ऑक्‍सिजन असायचे. यामध्ये काहीतरी बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याची कल्पना समोर आली. त्यानुसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 210 किलो वजनाचे ऑक्‍सिजन सिलेंडर तयार केले. यात आधुनिक सोयीसुविधांमुळे किती ऑक्‍सिजन वापरले गेले आणि किती शिल्लक आहे याचीही माहिती मिळते. तसेच, पुन्हा-पुन्हा ते बदलण्याची गरज भासत नाही. त्यामुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्ससाठी ही सुविधा अधिक सुलभ झाल्याने त्यांच्याकडून मागणी वाढली आणि प्रतिसादही लाभला. परिणाम आजमितीस शहरातील 70 टक्के हॉस्पिटल्सला पिनॅकल इंडस्ट्रिज्‌चे ऑक्‍सिजन सिलेंडर वापरले जातात. 

(शब्दांकन - नरेश हाळणोर) 

Web Title: Oxygen cylinder for new technology