स्वःकष्टातून उभारला गृहउद्योग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, यासाठी अंबाझरी टेकडी येथील झोपडपट्टी भागातील आदिवासी महिलांनी २०१६ मध्ये गोंडवाना सोडूम महिला बचतगटाची स्थापना केली. महिलांची मेहनत आणि जिद्द पाहून प्रकल्प कार्यालयानेही त्यांना त्वरित  अर्थसाहाय्य करीत गृहउद्योग उभारण्यास ८५ टक्के अनुदान मंजूर केले. या बचतगटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. 

नागपूर - आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, यासाठी अंबाझरी टेकडी येथील झोपडपट्टी भागातील आदिवासी महिलांनी २०१६ मध्ये गोंडवाना सोडूम महिला बचतगटाची स्थापना केली. महिलांची मेहनत आणि जिद्द पाहून प्रकल्प कार्यालयानेही त्यांना त्वरित  अर्थसाहाय्य करीत गृहउद्योग उभारण्यास ८५ टक्के अनुदान मंजूर केले. या बचतगटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. 

गोंडवाना सोडूम महिला बचतगटाच्या अध्यक्ष शुभांगी शेराम यांच्यासह सदस्या ममता धुर्वे, पल्लवी परतिके, सुमन पंधरे, सुनीता धुर्वे, शालू खंडाते, राधा भलावी, वंदना कुकडे यांनी रोजंदारी करून, एक एक पैसा जोडला. सुरुवातीला शंभर रुपये महिना बचत केली. त्यातून जमा झालेल्या पैशातून शोभेच्या वस्तू, लोणचे, चटणी असे साहित्य विकले. मिळालेले पैसे बॅंकेत जमा केले. त्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी नागपूर यांनी आदिवासी महिला बचतगट अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत मिरची मसाला उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. कार्यालयीन कामांची पूर्तता झाल्यानंतर २ ऑगस्ट रोजी स्व. नारायणसिंह उईके प्रवेशद्वार अंबाझरी टेकडी हिल रोड नागपूर येथे माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी यांच्या अध्यक्षतेखाली अपर आयुक्त हृषिकेश मुळक यांच्या हस्ते आदिवासी महिलांच्या गृहउद्योगाचे उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष विवेक नागभिरे, कार्याध्यक्ष वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे, रश्‍मी उईके, ऋतिका मसराम यांची उपस्थिती होती. 

आर्थिक नियोजनातून व्यवसाय 
आदिवासी महिला एकत्र येऊन प्रतिमहा शंभर रुपयेप्रमाणे बॅंकेत बचत करायच्या २४ महिन्यात २ हजार ४०० रुपये जमा झाले. या पैशात शोभेच्या वस्तू, लोणचे, चटणी छोटा-मोठा व्यवसाय करून १४  हजार रुपये त्यांनी कमविले. महिलांची कामगिरी पाहून आदिवासी विकास विभागाने पडताळणी केल्यानंतर गटाला २ लाख ५० हजार रुपयांच्या योजना मंजूर केल्या. यात ८५ टक्के अनुदान व १५ टक्के गटांचा सहभाग होता. गटाने ३७ हजार ५०० रुपये स्वत:चे भरून २ लाख १२ हजार ५०० रुपये अनुदान प्राप्त केले. त्यातून स्वत:च्या आवडीनुसार मिरची, मसाला दळण मशीन व इतर किरकोळ खरेदी करून गृहउद्योगाची स्थापना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adivasi women Self-made housing industry