पर्यावरण जतनाचे ‘इकोसत्त्व’! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

स्टार्टअपला समाजसेवेची जोड देत काम करणारे औरंगाबादमधील नताशा झरीन व गौरी मिराशी यांनी सुरू केलेले इकोसत्त्व एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन’ हे असेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेले स्टार्टअप.. 

स्टार्टअपची संकल्पना आता देशामध्ये चांगलीच रुजली आहे. नोकरी, व्यवसाय, धंदा याच्यापलीकडे स्वत:ची कंपनी असावी या संकल्पनेतून स्टार्टअप सुरू होतात. स्टार्टअपच्या जोडीने समाजसेवेचे काम करण्याचा मानसही अनेक स्टार्टअप जोपासत आहेत. स्टार्टअपला समाजसेवेची जोड देत काम करणारे औरंगाबादमधील नताशा झरीन व गौरी मिराशी यांनी सुरू केलेले इकोसत्त्व एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन’ हे असेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेले स्टार्टअप.. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नताशा आणि गौरी यांनी एकत्र येऊन ‘इकोसत्त्व एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन’ची सुरुवात केली. ‘Natural Root Zone’ तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाण्याचा निचरा करणे व या प्रक्रियेतून सांडपाणी पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्याचे महत्त्वाचे काम या स्टार्टअपमधून केले जाते. जैवविविधता जोपासण्यासाठी आणि वनीकरणामध्ये वाढ करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या या पाण्याचा स्टार्टअपच्या माध्यमातून पुन्हा वापर केला जातो. हे पाणी वापरून अनेक झाडे जगवली गेली आहेत व त्याचबरोबर उजाड जमिनीवर वनीकरणाच्या माध्यमातून हिरवाई जोपासली गेली आहे. यामध्ये शहरी, ग्रामीण आणि खासगी जागांसाठी ही यंत्रणा पुरवली जाते व पर्यावरण जतनाचे काम केले जाते. शहरात सिमेंटची जंगले उभारली गेल्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम थेट झाडांची संख्या रोडावण्यावर होतो. झाडांचे संवर्धन आणि मुख्य म्हणजे सातत्याने लागणारे पाणी यासाठी Natural Root Zone तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन ही शहरांपुढील मोठी समस्या आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ या दोन सरकारी योजनांना मदतीचा हात देण्याचे काम स्टार्टअप करते. घनदाट वनांच्या निर्मितीसाठी स्टार्टअप काम करीत असून, ५००० चौरस फूट जागेवर झाडे जगवण्याचे काम पूर्ण केले आहेत. यासाठी स्टार्टअप ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाचा वापर करते. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी परिसरामध्ये विपुल वृक्षारोपणावर भर देणे आवश्यक असते. त्यासाठी मॉडेल विकसित करणे व इतर भागांमध्ये त्याच धर्तीवर वृक्षांची लागवड करणे, स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशामध्ये विकासकामे होत असताना पर्यावरणावर मोठे आघात होताना दिसत आहेत. हवामान बदल, जैवविविधता नष्ट होणे, प्रदूषण या जागतिक पातळीच्या समस्या भारतातही आहेतच. त्या कमी करण्याचा नताशा आणि गौरी यांचा प्रयत्न आहे. या दोन ‘स्वयंसिद्धा’ स्टार्टअपच्या माध्यमातून पर्यावरणासाठी काम करत आहेत. सुखकर भविष्याकरिता आजच प्रयत्न करणे गरजेचे आहे, हाच संदेश या स्टार्टअपच्या माध्यमातून मिळतो. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पर्यावरण क्षेत्रात काम करणे आव्हानात्मक होते, मात्र आम्ही सामर्थ्याने, ताकदीने आणि अनपेक्षित मार्गांनी त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांत तयार झालेली टीम हीच आमची सर्वोत्तम मालमत्ता आहे. भागीदार, फंडर्स, सल्लागार या सर्वांमुळेच एक चांगली पर्यावरण विशेष प्रणाली तयार होण्यास मदत झाली. 
- गौरी मिराशी 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगरपालिकेची बैठक असो किंवा एखाद्या उद्योगाची परिषद, अनेक ठिकाणी आम्हाला महिलांचे प्रतिनिधित्त्व कमी प्रमाणात दिसते. आम्ही काम करत असलेला दृष्टिकोन ठेऊन सगळ्याच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची समाजाला गरज आहे. ही अनोखी आणि आपल्या संस्कृतीला अधिक सामर्थ्य देणारी प्रणाली आहे. 
- नताशा झरीन 

(शब्दांकन - ऋतुजा कदम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about environment natasha zarin & gauri mirashi startup