रस्त्यांवरील मुलांसोबत वाढदिवस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नागपूर - लहान मुलांचा वाढदिवस आप्तस्वकीयांमध्ये ‘सेलिब्रेट’ करणारे शेकडो कुटुंबे नजरेस पडतात. मात्र, रस्त्यावर मुलांसोबत वाढदिवसाचा आनंद ‘शेअर’ करणारे कुटुंब क्‍वचितच पाहायला मिळतात. आठवा मैल, वाडी येथे राहणाऱ्या हिरेकर परिवाराने त्यांच्या लाडलीचा पहिलावहिला वाढदिवस चक्‍क भिक्षेकरी गरीब मुलांसोबत साजरा करून नवा आदर्श निर्माण केला.

मोनील व सुप्रिया या हिरेकर दाम्पत्याची एकुलती एक मुलगी अनायता हिचा बुधवारी पहिला वाढदिवस होता. सर्वसामान्यांप्रमाणे ते हा आनंद नातेवाइकांच्या गोतावळ्यात साजरा करू शकले असते. परंतु, त्यांनी तसे न करता रस्त्यावरील गरीब मुलांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुलीसाठी नवीन कपडे तर खरेदी केलेच. शिवाय मुलांसाठीही खाऊचे गिफ्ट पॅकेट घेतले. वाढदिवसाच्या दिवशी अबोल अनायताच्या हातून टेकडी गणेश मंदिर, शनी मंदिर, पंचशील चौक व अन्य भागांतील रस्त्यावर भीक मागणाऱ्या जवळपास २५ ते ३० मुलांना खाऊची गोड भेट दिली. दोन ते तीन तास त्या मुलीला घेऊन उन्हातान्हात शहरात फिरल्या.

सुप्रिया यांनी अनेकवेळा कमाईतील काही वाटा गरिबांसाठी दिला आहे. भविष्यातही अशाप्रकारची सामाजिक बांधीलकी जपण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. शिवाय अनायताकडूनही त्यांना भविष्यात अशाच समाजकार्याची अपेक्षा आहे. सुप्रिया डिफेन्स परिसरात महिलांना योगा शिकविते तर मोनिल खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

कामानिमित्त शहरात फिरताना फाटक्‍या कपड्यातील गरीब मुले नजरेस पडतात. त्यांना या अवस्थेत पाहून खूप वाईट वाटायचे. त्यामुळे मुलीचा वाढदिवस अशा मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. वेगळे किंवा खूप मोठे काम केले नाही. परंतु, वाढदिवसाच्यानिमित्ताने गरीब मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालेला आनंद शब्दापलीकडचा होता.
- सुप्रिया हिरेकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday with children on the road Motivation

टॅग्स