#MumbaiMarathon चमकले अंध माणदेशी खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

विलास गेंड आणि सचिन तुपे हे दोघे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संचलित माणदेशी अभ्यास केंद्रात बीए भाग तीनमध्ये शिकत आहेत. या स्पर्धेसाठी येथील माणदेशी चॅम्पियन्स्‌ क्रीडा संकुलनात विद्यार्थ्यांचा  यमित सराव क्रीडा प्रशिक्षक श्री. लोखंडे यांनी करून घेतला. 

म्हसवड (ता. माण, जि. सातारा) : अंध विद्यार्थी विलास गेंड आणि सचिन तुपे यांनी मुंबई येथे काल झालेल्या टाटा मॅरेथॉन-2020 मध्ये भाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सोबत येथील माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा व माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनीही सहभाग घेऊन दहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन 93 मिनिटे दहा सेकंदात पूर्ण केली. 

हे वाचा - भाजप सरकारच्या काळात ठरले होते पण...

ही स्पर्धा छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून सुरू होवून आझाद मैदान येथे संपली. या स्पर्धेत दोनशेहून अधिक संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांनी तर इतर सुमारे 55 हजार हून जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. 

आवश्‍‍य वाचा - सातारकरांनाे तुमचा वाहन परवाना सस्पेंड हाेऊ शकताे

विलास व सचिन यांनी पहिल्यांदाच अशा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी माणदेशी संस्थेच्या चेतना सिन्हा यांच्यामुळे मिळाली. विलास गेंड आणि सचिन तुपे हे दोघे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संचलित माणदेशी अभ्यासकेंद्रात बीए भाग3 मध्ये शिकत आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना येथील माणदेशी चॅम्पियन्स्‌ क्रीडा संकुलनात त्यांचा नियमित सराव क्रीडा प्रशिक्षक श्री. लोखंडे यांनी करून घेतला. 

आवश्‍‍य वाचा - भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blind Players From Mandesh Shine At Mumbai Marathon