धन्यवाद विजय शिवले

जाहिरात
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. विजय शिवले झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत, त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपुर्वक धन्यवाद.

पुणे: आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. विजय शिवले झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत, त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपुर्वक धन्यवाद.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी परिसरात झोपडपट्ट्यांची संख्या मोठी. याच परिसरातील जयप्रकाशनगर परिसरात राहणारा विजय शिवले दहावीनंतर एका संस्थेसाठी वस्तीतील मुलांसाठी अभ्यासिका घेऊ लागला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. दरम्यान विजयला एका कंपनीत नोकरी लागली, मात्र वस्तीतील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे हा ध्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. वस्तीतील मुलांना सुशिक्षित करण्यासाठी चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. खरंतर घरची आर्थिक परिस्थिती नोकरीचा राजीनामा देण्यासारखी नव्हती;विजयने १ मे २००१ रोजी ‘सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प’ स्थापन केला. आजमितीला सुमारे चाळीस वस्त्यांतून दोनशेच्या आसपास कार्यकर्त्यांच्या (शिक्षकांच्या) मदतीने सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी दररोज अभ्यासिका चालवली जाते.

ज्या वस्तीत वाढला, त्या वस्तीतून विजयने अभ्यासिका सुरू केली. एका संस्थेने वस्तीत मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली होती. पैशांची गरज असल्याने महिना शंभर रुपये मानधनावर त्याने काम सुरू केले. दिवसभर कॉलेज करून सायंकाळी वस्तीतील मुलांना शिकवायला काय हरकत आहे, असा विचार करून अभ्यासिका ‘जॉईन’ केली. काम वाटले तेवढे सोपे नव्हते. पहिल्या दिवशी अवघी दहा मुले अभ्यासिकेत आली. मग मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची समजूत घालून मुलांना अभ्यासासाठी पाठवा म्हणून आग्रह धरायला लागला.

वस्तीत दिवसभर व विशेषतः सायंकाळी खूप गोंधळ असतो. शांतता मिळण्यासाठी सकाळी सहा वाजता वर्ग सुरू केले. मुलं कशी तरी उठून आलेली असायची. त्यांना अभ्यासिकेत आल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालायची मग वर्ग सुरू व्हायचा. अंघोळ न करून आलेल्यांना वर्गात गार पाण्याने अंघोळ घातली जात असल्याचे लक्षात आल्यावर मुलं घरूनच अंघोळ करून यायला लागली. पहिल्या वर्षी दहापैकी आठ मुलं पास झाली. नापास होणारा मुलगा पास झाल्याने वस्तीत चांगला संदेश गेला. दुसऱ्या वर्षी ‘अभ्यासिका केव्हा सुरू होणार’ म्हणून वस्तीतील पालकांकडून विचारणा झाली. दहाची संख्या पुढच्या वर्षी २५० वर गेली.भविष्यात किशोरी प्रकल्पांतर्गत मुलींसाठी नर्सिंग कोर्स, बेकरी प्रॉडक्‍ट, ज्वेलरी मेकिंग, सॅनिटरी नॅपकीन आदींवर काम सुरू आहे. या समाजकार्याबद्दल शिवले यांना कॅडबरी डेअरी मिल्ककडून मनःपूर्वक धन्यवाद !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cadbury Dairy Milk thanks to Vijay Shivale for his outstanding work