श्रमदानातून किनाऱ्याला मिळाली झळाळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मालवण - आपला समुद्रकिनारा आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने चिवला बीच वॉटर स्पोर्टस्‌ संस्था, हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने श्रमदानातून धुरीवाडा येथील चिवला समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी किनाऱ्यावरील प्लास्टिक बाटल्या, तुटलेली जाळी, माडाची झावळे, लाकडे, खराब झालेले मच्छीमारी साहित्य व इतर प्रकारचा कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. बीचवरील बंधाऱ्याच्या दगडांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडीसह त्यात अडकलेला कचराही साफ करण्यात आला. गोळा केलेल्या कचऱ्याची आडारी येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये विल्हेवाट लावण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत सचिन गोवेकर, भाई कासवकर, मनोज मेथर, रोहित मेथर, विल्सन फर्नांडिस, संतोष सावंत, सुरेश देशमुख, बालो आडिवरेकर, सुनील फर्नांडिस, स्वीटन फर्नांडिस, संतोष चिंदरकर, रिचर्ड सोज, पपू रॉड्रिग्ज, बस्त्याव फर्नांडिस, वसंत गावकर, संदेश राऊळ, मंदार गाड, किशोर मयेकर, पार्थ परब, नागेश मसूरकर, पावलो सोज, ऑल्विन फर्नांडिस, अमर मणचेकर, ताता मसूरकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: chiwala beach clean