#WednesdayMotivation : स्नेहवन संस्थेत कंटेनरमध्ये साकारलेय ग्रंथालय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

पाहुण्यांसाठी ठरतेय आकर्षण
आगळ्यावेगळ्या ग्रंथालयाचे सुशोभीकरणही आश्रमातील मुलांनी केले आहे. त्यांनी स्वतः काढलेली चित्रे ग्रंथालयात लावली आहेत. हे ग्रंथालय संस्थेला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे. ही संस्था संपूर्णपणे दानशूरांची मदत आणि देणग्यांवर चालविली जाते.

आळंदी - औद्योगिक भागात; तसेच एखाद्या बांधकामाच्या साइटवर कंटेनर अनेकदा आपण पाहतो. अशा कंटेनरमध्ये वाचनालय ही कल्पनाच आपण करू शकत नाही. मात्र कंटेनरमध्ये वाचनालय उभारण्याची किमया केली आहे आळंदीजवळील कोयाळी गावात ‘स्नेहवन’ या सामाजिक संस्थेने. संस्थेद्वारे संगोपन होत असलेल्या मुलांसाठी हे ‘कंटेनरमधील ग्रंथालय’ खुले केल्याची माहिती ‘स्नेहवन’चे संस्थापक अशोक देशमाने यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आळंदीपासून दहा ते अकरा किलोमीटरवरील कोयाळी गावात स्नेहवन संस्था आहे. विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची; तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची ५० मुले या संस्थेत आहेत. त्यांचे शिक्षण, निवास, भोजनाचा खर्च संस्थेमार्फत केला जातो. याशिवाय परिसरातील ३० मुलींना संस्थेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.

...ते मुलीसाठी झिजवताहेत दवाखान्याच्या पायऱ्या

अकरावीपर्यंतची मुले या संस्थेत असून, त्यांना शिक्षणात वेगळेपणा वाटावा आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संस्थेच्या वतीने ग्रंथालय उभारण्यात आले 
आहे. अमेरिकेतील ‘बुकवाला’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीना जेकब यांनी संस्थेच्या माध्यमातून इंग्रजीतील विविध पुस्तके या ग्रंथालयासाठी भेट दिली आहेत. कंटेनरमधील ग्रंथालय हा प्रयोग देशात प्रथमच राबविला असल्याचे श्री. देशमाने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Container Library in Container at Snehavan Institute