...ते मुलीसाठी झिजवताहेत दवाखान्याच्या पायऱ्या

राजकुमार थोरात
Wednesday, 19 February 2020

मदतीसाठी खाते क्रमांक 

 • नाव -  किसन साहेबराव काटे, 
 • बॅंक - युनियन बॅंक ऑफ इंडिया, 
 • खाते क्रमांक - ४१७५ ०२०१ ००१० ८२६
 • शाखा - काटेवाडी, ता. बारामती.
 • आयएफसी कोड - UBIN ०५४१ ७५३.
 • मोबाईल क्रमांक : ९८८१ ७५९८ २०

वालचंदनगर - काटेवाडी (ता. बारामती) माहेर अन्‌ वाघळवाडी (ता. बारामती) सासर असलेल्या आरती अमित सावंत या विवाहितेचे यकृत (लिव्हर) खराब झाल्याचे निदान झाले असून, तिला यकृत प्रत्यारोपणासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दवाखान्याचा डोंगराएवढा खर्चाचा आकडा ऐकून तिच्या माहेरचे काटे कुटुंब व सासरचे सावंत कुटुंब हतबल झाले आहे. तिच्या   उपचारासाठी तिचे वडील दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहेत. 

काटेवाडी येथील आरती किसन काटे ही युवती भवानीनगरच्या श्री छत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सन २०१८-१९ मध्ये वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. तिचा बारामती तालुक्‍यातील वाघळवाडीमधील युवक अमित सावंत यांच्याशी सन २०१८ मध्ये विवाह झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिला गंभीर आजाराने ग्रासले. तिला सुरुवातीला कावीळ झाली. त्यानुसार सुरुवातीला प्राथमिक उपचार केले.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

मात्र, तिचे यकृत खराब झाल्याचे पुण्यातील खासगी रुग्णालयात निदान झाले. तिचे वडील किसन काटे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तसेच, सासरचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. आरतीचे वडील किसन काटे हे तिच्यावर उपचार करण्यासाठी पुण्यातील नामांकित दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहेत. तिच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी डॉक्‍टरांनी सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च सांगितला आहे.

Video : शिवराई नाणं आजही खणखणीत

 एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्चाचे आकडे ऐकून तिचे माहेरचे व सासरे लोक चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, तिच्यावर उपचार करण्याची जिद्द उराशी बाळगून तिची आई आशा व वडील किसन यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

वर्गमैत्रिणीसाठी सरसावले विद्यार्थी
आरतीच्या गंभीर आजाराची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी रोख स्वरूपात मदत गोळा करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी जेमतेम १७ हजार रुपये जमा करून आरतीच्या कुटुंबाकडे सोपविले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य बबन भापकर यांच्यासह शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तिला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. मात्र, तिला मोठ्या रकमेच्या उपचाराची गरज आहे.

मदतीसाठी खाते क्रमांक 

 • नाव -  किसन साहेबराव काटे, 
 • बॅंक - युनियन बॅंक ऑफ इंडिया, 
 • खाते क्रमांक - ४१७५ ०२०१ ००१० ८२६
 • शाखा - काटेवाडी, ता. बारामती.
 • आयएफसी कोड - UBIN ०५४१ ७५३.
 • मोबाईल क्रमांक : ९८८१ ७५९८ २०

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help to aarti kate sawant for liver transplant