esakal | आता आशासेविकांची रुग्णांवर राहणार 24 तास नजर; शेनवडीत विलगीकरण कक्षाची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Care Center

आता आशासेविकांची रुग्णांवर राहणार 24 तास नजर; शेनवडीत विलगीकरण कक्षाची निर्मिती

sakal_logo
By
सुहास शिंदे

पुसेसावळी : शेनवडी (ता. खटाव) गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातील युवकांनी विलगीकरण कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षात 22 रुग्णांची सोय होईल, अशा प्रकारे सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन ऑक्‍सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. पुरुष व महिला रुग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधाही करण्यात आल्या आहेत. (Corona Care Center Started At Shenwadi Satara News)

रुग्णांवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आशासेविका काम करणार आहेत. या आयसोलेशन सेंटरचे उद्‌घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाचे व गावातील युवकांचे भरभरून कौतुक केले. या सेंटरसाठी आनंदा घाडगे, रवींद्र घोडके, किरण कोकाटे, बबन माळी, ज्ञानेश्वर कोकाटे, सुभाष कोकाटे, अतुल दबडे, सतिश कोकाटे, जहांगीर तांबोळी, सागर जाधव, संजय सुतार, विश्वास चव्हाण, शहाजी कोकाटे, मारुती घोडके, ज्ञानेश्वर जाधव, दीपक कोकाटे, सचिन सातपुते, सदाशिव कोकाटे, अधिक वाघमारे, आबासो रसाळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

राज्यावर कोरोना संकट! महिन्याचे वेतन देऊन 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी

Corona Care Center Started At Shenwadi Satara News

loading image
go to top