हुतात्मा मोरेंच्या कर्तव्याची जाण, सावलीला ऑक्‍सिजन मशिन प्रदान!

विजय सपकाळ
Thursday, 8 October 2020

हुतात्मा शशिकांतच्या कार्याचे व सेवेचे कौतुक करून कोरोनाच्या साथीत मोरे ऍकॅडमीच्या वतीने सावलीला दिलेली ऑक्‍सिजनची मशिन लोकोपयोगी असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी सांगितले.

मेढा (जि. सातारा) : सावली येथील हुतात्मा पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा शशिकांत मोरे ऍकॅडमी व वीरपिता तुकाराम मोरे यांच्या वतीने सावली गावास सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या हस्ते सरपंच नंदा जुनघरे यांच्याकडे ऑक्‍सिजन मशिन प्रदान करण्यात आले. 

प्रारंभी हुतात्मा शशिकांत मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, उद्योजक विजय शेलार, शिवसेनेचे जावळी तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, सावलीच्या सरपंच नंदा जुनघरे, पोलिस पाटील संजय कांबळे-पाटील, नामदेव जुनघरे गुरुजी, विश्वासराव जुनघरे, संजय रसाळ, गोपीनाथ जेधे, कृषी सहायक श्री. चौधरी, एकनाथ जुनघरे, बाबूराव जुनघरे, शंकरराव मोरे, संजय जुनघरे, विष्णू लकडे, अर्जुन चिकणे, धनंजय सपकाळ आदी उपस्थित होते. 

साता-याची चौपाटी अजूनही लॉक! 500 व्यावसायिकांना फटका

सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी हुतात्मा शशिकांतच्या कार्याचे व सेवेचे कौतुक करून कोरोनाच्या साथीत मोरे ऍकॅडमीच्या वतीने सावलीला दिलेली ऑक्‍सिजनची मशिन लोकोपयोगी आहे. चोरांबेचे सरपंच विजय सपकाळ, सावलीचे माजी सरपंच दुर्योधन जुनघरे, वसंतराव मस्कर यांच्यासह हुतात्मा मोरे कुटुंबिय, नातेवाईक, ग्रामस्थ व अजिंक्‍य नेहरू मंडळाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. नामदेव जुनघरे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. आनंदा मोरे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution Of Oxygen Machine In Sawali Village Satara News