आत्महत्याग्रस्त दांपत्याच्या कुटुंबाला मदत; मेढ्यातील कातकरी कुटुंबातील मुलांना दिलासा

आत्महत्याग्रस्त दांपत्याच्या कुटुंबाला मदत; मेढ्यातील कातकरी कुटुंबातील मुलांना दिलासा

केळघर (जि. सातारा) : मेढ्यात आठ दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या कातकरी समाजातील दांपत्याच्या उघड्यावर पडलेल्या मुलांसह कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्वारी, गहू, कट्टा, तेल, मीठ, चटणी असे जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप करून आधार दिला. 

मेढ्यातील हे कातकरी कुटुंब गेल्या आठ दिवसांपासून अडचणीत आहे. राहण्यासाठी घर नाही तर खाण्यास अन्न नाही. श्री. रांजणे यांनी या कुटुंबीयांची विचारपूस केली असता त्यांना कुटुंबीयांचे डोंगराएवढे दुःख पाहून खूप वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी आपल्या ज्ञानदेव रांजणे मित्र समूहाच्या वतीने या कुटुंबाला दर महिना पुरेल एवढे अन्नधान्य, तसेच लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यात या कुटुंबाला घरकुल मंजूर करून त्याचाही लागणारा कमी जास्त खर्च मित्र समूहाच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला.
 
श्री. रांजणे म्हणाले, ""सर्वसामान्य व्यक्तींना नेहमी आधार देण्याचे काम आमदार भोसले हे करत आले आहेत. कोरोना काळातही तालुक्‍यातील जनतेला मोठा दिलासा देण्याचे काम केले असून, आमदार भोसले यांनी विधायक उपक्रमांना पाठबळ दिल्याने जावळी तालुक्‍यात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.'' 

या वेळी मेढ्याचे नगराध्यक्ष अनिल शिंदे, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, नगरसेवक विकास देशपांडे, प्रवीण महाराज, सागर धनावडे, सुनील देशमुख आदी मान्यवरांनी या कुटुंबीयांना अन्नधान्याचे साहित्य वाटप केले. 

महाबळेश्वर पालिकेत रंगले व्हीप वॉर; विरोधकांचा सभेवर बहिष्कार

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com