#SundayMotivation : तुला शाळेत जायचे असेल तर तुझ्यासोबत लहान भावाला सोबत घेऊन शाळेत जा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

‘इच्छा असेल तर मार्ग हा निघतोच,’’ ही उक्ती माळेगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी ठाकर समाजातील रेश्‍मा रामदास जाधव या विद्यार्थिनीने खरी करून दाखविली.

सातगाव पठार - ‘इच्छा असेल तर मार्ग हा निघतोच,’’ ही उक्ती माळेगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी ठाकर समाजातील रेश्‍मा रामदास जाधव या विद्यार्थिनीने खरी करून दाखविली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आपल्या लहान भावाला आपल्यासोबत शाळेत आणून त्याचा सांभाळ करत रेश्‍मा शिक्षण घेत,’’ असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

आणखी वाचा - वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्रााला शरद पवारांचं उत्तर

‘तुला शाळेत जायचे असेल तर तुझ्यासोबत लहान भावाला सोबत घेऊन शाळेत जा. दिवसभर अभ्यास करून बाळाचा सांभाळ कर, नाहीतर शाळा सोडून घरी राहा,’’ असा पालकांनी दम दिला. त्यानंतर रेश्‍माला प्रश्न पडला की, आता शाळेत कसे जायचे? मात्र, शाळेच्या ओढीने तिने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. रेश्‍माने लहान भावाला सोबत घेऊन शाळा गाठली. जेव्हा ती भावाला घेऊन शाळेत आली आणि आपली अडचण मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका हेमा घोलप यांना सांगितली. तेव्हा त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जर या मुलीला भावासह शाळेत बसू दिले नाही तर ही हुशार, गुणी मुलगी शिक्षणच्या प्रवाहातून बाहेर जाईल म्हणून व्हरांड्यात झोका बांधून आणि त्यात तिच्या भावाला झोपवले. भावाला सांभाळणेपण झाले आणि शाळेत पण येता आले. तिच्या या हुशारीचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education reshma jadhav motivation