वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्राला पवारांचं उत्तर; 'तुम्हाला संप्रदायच कळाला नाही'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं होतं. त्या पत्रकाचा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी दोन दिवसांपूर्वी निषेधही केला होता मात्र, सर्वांना उत्सुकता होती ती शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात त्याची.

पुणे : ''कुठल्याही देवाला जाण्यासाठी मला कुणाच्या परवानगीची गरज नाही, ज्यांनी मला जाण्यास विरोध केला होता त्यांना वारकरी सांप्रदायच समजला नाही. त्यामुळे असल्या लहान गोष्टींकडे लक्ष देत नाही'' अशा शब्दात राष्ट्रीय वारकरी परिषदेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. 

पिंपरीत बसथांब्यावर कोसळले झाड: प्रवासी जखमी 
 

कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यात शरद पवार उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार उद्योग मंत्री दिलिप वळसे पाटील, शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर, आमदार दिलिप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांची प्रमुख उपस्थित होते.

पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; दहा लाखांच्या खंडणीची मागणी

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं होतं. त्या पत्रकाचा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी दोन दिवसांपूर्वी निषेधही केला होता मात्र, सर्वांना उत्सुकता होती ती शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात त्याची. आज आळंदीत शरद पवार यांनी यावर खास शैलीत उत्तर दिले. यावेळी पवार यांनी लहानपणापासून मामासाहेब सोनोपंत दांडेकर आणि वारकरी संप्रदायाशी त्यांचा संबंध आल्याचे सांगितले. आईच्या सांगण्यावरून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी घरातून भाकरी बांधून आणत असल्याचेही सांगितले तर, मुख्यमंत्री असताना तिर्थक्षेत्रांसाठी निधी पुरवून विकासाचा संकल्प केला. मात्र, केलेल्या कामाची कधी जाहिरातबाजी केली नाही असेही सांगायला पवार विसरले नाहीत. 

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला

आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेशी चाळीस वर्षांचा ऋणानुबंध असून पवार यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात यापूर्वी अठरा लाख रूपयांची देणगी जाहीर केली होती. तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदीतील नव्या इमारतीचे उद्घाटनही केले. आज आळंदीतील चाकण चौकात जोग महाराज चौक असे नामकरण पवार आणि कुरेकर महाराजांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान कार्यक्रमाला येण्यापूर्वी पवार यांनी आळंदीतील माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी त्यांचा शाल ज्ञानेश्वरी देत सन्मान केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar reply to the controversial letter from the Rashtriya Varkari Council