esakal | अकराव्या वाढदिनाचा खर्च सियाने पाठविला पंतप्रधान निधीस
sakal

बोलून बातमी शोधा

अकराव्या वाढदिनाचा खर्च सियाने पाठविला पंतप्रधान निधीस

सिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची चाहती आहे. मोदीजींचे भाषण ती कायम ऐकते. मोदींच्या प्रत्येक आवाहनाला तिने आपल्या कुटुंबियांना सांगून प्रतिसाद द्यायला लावला आहे. 

अकराव्या वाढदिनाचा खर्च सियाने पाठविला पंतप्रधान निधीस

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या थैमानाने संपूर्ण जग व्यापले आहे. या आजारावर अजूनही कोणते औषध वा लस उपलब्ध न झाल्याने दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची व मृत्यूची संख्या वाढू  लागली आहे. अशा या संकटकाळी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी मदतीसाठी आवाहन केले. त्यानुसार टाटा बजाज या मोठया उद्योगपती बरोबरच अनेकांनी आपापल्या परीने शासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. अशात तारळे (ता.पाटण) येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या सिया गोविंद लाहोटी या अकरा वर्षीय शाळकरी मुलीने आपला वाढदिवसासाठी गोळा केलेले ११११ रुपये वाढदिवस दिनीच कोव्हिड विषाणूच्या लढ्याला दिले आहेत. याचे तारळे विभागात कौतुक होत आहे.

येथील स्टेशनरी व्यापारी असलेले गोविंद लाहोटी यांची सिया मुलगी आहे. सिया ही शाळेत देखील हुशार व संवेदनशील स्वभावाची म्हणून परिचीत आहे. आपल्या मैत्रिणींमध्ये म्हणून ती आवडती आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची चाहती आहे. मोदीजींचे भाषण ती कायम ऐकते. मोदींच्या प्रत्येक आवाहनाला तिने आपल्या कुटुंबियांना सांगून प्रतिसाद द्यायला लावला. जनता कर्फ्यु दिवशी वडिलांचे दुकान बंद ठेऊन त्यानंतर जनतेसाठी कार्य करणाऱ्या पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगारांप्रती थाळी, टाळ्या वाजवल्या, तसेच कालच दीप लावून कालच्या मोदींच्या आवाहनाला देखील तीने कुटुंबियांसोबत प्रतिसाद दिला. 

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीचा आवाहनाला देखील प्रतिसाद देत आपला खारीचा वाटा उचलला. तिचा अकरावा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने जमविलेले 1111 रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचे ठरवले. त्याची कल्पना वडील व कुटुंबियांना सांगितली. त्यांनीही तीस होकार देऊन पाठिंबा दर्शविला. मग ताबोडतोब पैसे पाठवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. आपले खाऊचे पैसे वाचवून केलेल्या मदतीबद्दल सिया लाहोटी या चिमुरडीचे मोठे कौतुक होत आहे. थोरा मोठ्याना लाजवेल असे काम केल्याने तिच्याबदल अनेकांना कुतुहुल निर्माण झाले असून इतरांसाठी तिचे कार्य आदर्शवत असेच आहे. 

Lockdown : अडीच हजार रिक्षाचालक अडचणीत; चालकांसह त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Lockdown : अखेर बिबट्याचा बछडा विसावला आईच्या कवेत

आपण पॉझिटिव्ह तर नाही ना, या विचाराने ते रात्रभर झोपलेच नाही