माजी सैनिकांचा पुढाकारातून माेरबागचे विद्यार्थी बनले टेक्‍नोसॅव्ही

माजी सैनिकांचा पुढाकारातून माेरबागचे विद्यार्थी बनले टेक्‍नोसॅव्ही

नागठाणे (जि.सातारा) : ऑनलाइन शिक्षणाचा प्रवाह खेडोपाडी पोचत असताना जिल्ह्यातील माजी सैनिकांनी एकत्र येत दुर्गम भागातील एक शाळा टॅबयुक्त केली आहे. दोन धरणे ओलांडून पोचावे लागणाऱ्या मोरबाग येथील शाळेस या सैनिकांनी मोलाची मदत केली आहे. 

मोरबाग हे सातारा तालुक्‍यातील दुर्गम गाव. भोवताली गर्द जंगल. दळणवळणाच्या समस्या. त्यात ऊन, वारा, थंडी अन्‌ पाऊस या हवामानाचा अडसर. मोरबागला पोचायचे तर पांगारे अन्‌ पळसावडेची छोटी धरणे ओलांडून पुढे जावे लागते. अशाही स्थितीत बोंडारवाडी, पळसावडे, सांडवली, ताकवली इथले विद्यार्थी मोरबागच्या शाळेत शिक्षण घेतात. शाळेचे मुख्याध्यापक विश्वास कवडे, गणेश शिंदे, विजय कदम यांनी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. त्याचीच दखल घेत समाजातील विविध घटक या शाळेसाठी मदतीचा हात सातत्याने पुढे करतात.

सध्याच्या काळातील "ऑनलाइन शिक्षणा'चे महत्त्व ओळखून जिल्ह्यातील सैनिकांनी या शाळेस टॅबची आगळी भेट दिली. त्यासाठी जाखणगाव (ता. खटाव) येथील उमेश शिंदे यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या मित्रांचा सहभागही तितकाच मोलाचा ठरला. त्यात विजय आरगे (सांगली), सचिन मोरे (सोनगाव), अजिंक्‍य घाडगे (खटाव), अक्षय कणसे (अंगापूर), विजय चव्हाण (एकंबे), सूरज निकम (अपशिंगे), राकेश साळुंखे (रायगड), विक्रम शिंदे (वाई), विकास चव्हाण (वर्धनगड), विक्रम शिंदे (जांब), अर्णव अभय घोरपडे (वेणेगाव), अविनाश भोसले (फलटण), सचिन चव्हाण, हणमंत मोरे, धीरज शिंदे, विक्रांत जाधव, सुधीर खावले या सैनिकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. दिनकर कोकरे, सुरेश अवकिरकर, विजय चव्हाण या स्थानिकांनीही भरीव मदत केली. उपक्रमशील शिक्षक दीपक मगर यांनीही शाळा टॅबयुक्त होण्यासाठी मोठे सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे, केंद्रप्रमुख दादाजी बागुल तसेच ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले. 

काळ आला होता, पण वेळ नाही! रेल्वे गेटमनचे प्रसंगावधान, अनेकांचे वाचविले प्राण

गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट 

अलीकडच्या काळात पुण्यातील परिवर्तन सामाजिक संस्था अन्‌ एस. बालान उद्योग समूहाच्या मदतीने शाळेतील सात विद्यार्थ्यांना सायकलींची भेट दिली. त्यातून रोज शिकण्यासाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ ठरला. तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी स्वतः भेट देऊन शिक्षकांच्या प्रयत्नाचे कौतुक केले होते.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com