शेतमजूर युवक बनला जमीनदार!

हेमंत पवार
शनिवार, 21 एप्रिल 2018

कऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथील अनिल हिंदुराव बाबर हा युवक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ते करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानी पै- पै साठवून वडिलार्जीत जमीन वहिवाटीखाली आणत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पिके फुलवण्याची किमया साधली आहे.

अनिल यांनी मजुरीतून मिळालेले पैसे साठवून त्यानी पहिल्यांदा वडिलार्जीत डोंगराकडेला असलेली जमीन सुस्थितीत आणून तेथे पीक घेण्यास सुरवात केली. त्यात रोजगार हमी योजनेतून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे विहिरेचे काम केले. त्या विहिरीला चांगले पाणी लागल्याने जमिनीची पाण्याची गरज भागू लागल्यामुळे मोठी चिंता मिटली. कृषी विभागाच्या सहकार्यातून ठिबक सिंचनाद्वारे भाजीपाला, उसासह अन्य पिके घेण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांना आई शोभाताई, भाऊ सुनील, चुलते दिनकर बाबर व कुटुंबीयांची साथ मिळत आहे. पुढे अनिल यांनी शेळी पालन करण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे शंभरहून अधिक शेळ्या आहेत. कृषी विभागाच्या प्रवीण सरवदे यांनी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, मंडल कृषी अधिकारी सुनील ताकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बाबर याना ५३ हजार रुपयांचे गांडूळ खत युनीट, बांधावर नारळ लागवड, यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टिलरसाठी ७५ हजार अनुदान दिले. त्या माध्यमातून अनिल यांनी शेतीमध्ये भरारी घेत स्वतः जमीनदार होण्याचे स्वप्न अवघ्या सात ते आठ वर्षांतच सत्यात उतरले आहे.

कष्ट केले तर सोन्याचा घासही खायला मिळतो हे मी स्वतः अनुभवत आहे. तरुणांनी शेती करायची लाज बाळगू नये. नोकरीच्या मागे न धावता वडिलार्जीत शेती करून कुटुंब सुखी ठेवावे. 
- अनिल बाबर, युवा शेतकरी

Web Title: farm worker anil babar Landlord success motivation