अपंगत्वावर मात करत प्रथम श्रेणीत पदवीधर 

अपंगत्वावर मात करत प्रथम श्रेणीत पदवीधर 

संगमेश्‍वर - जन्मानंतर वर्षातच पोलिओ झालेल्या एका भंगारवाल्याच्या मुलाने वाणिज्य शाखेचा प्रथम श्रेणीतील पदवीधर होण्याचा मान मिळवला. प्रबळ इच्छाशक्‍ती आणि जिद्द एखाद्याला कुठे नेते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोहंमद तकसिम खान.  

मूळ उत्तर प्रदेशमधील अरंज येथील तकसिम खान हे व्यवसायाच्या निमित्ताने  २५ वर्षे संगमेश्‍वरात वास्तव्यास आहेत. १९९६ ला जन्मलेल्या मोहंमदला दुसऱ्याच वर्षी पोलिओ झाला. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. वडिलांनी उपचारांची पराकाष्ठा केली मात्र तो अपंगच राहिला. प्राथमिक शिक्षण संगमेश्‍वर केंद्रशाळेत तर माध्यमिक शिक्षण पैसाफंड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. मोहंमदने दहावी, बारावीत प्रथम श्रेणी मिळवली. दरम्यानच्या काळात एमएससीआयटीचा कोर्स पूर्ण केला. मराठी, इंग्रजी टायपिंग परीक्षात उत्तम यश मिळवले. 

मोहंमद व्यायामासाठी रोज तासभर तीनचाकी सायकलवर बसून क्रिकेट खेळतो. नवनिर्माण महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेचा प्रथम श्रेणीतील पदवीधर झाला. ऑनलाईन निकाल पाहिल्यावर महमंदला आनंदाश्रू अनावर झाले. 

मला आई-वडिलांप्रमाणेच केंद्र शाळा संगमेश्‍वर, पैसाफंड हायस्कूल आणि नवनिर्माण महाविद्यालयातील सर्वांनी सर्वतोपरी मदत केली. ही मदत मी फुकट जाऊ देणार नाही. यापुढे मला स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवेत दाखल व्हायचे आहे. भावंडांचे शिक्षण आणि माझ्यासारख्याच अपंगांना मदत करायची आहे.
- मोहंमद तकसिम खान
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com