esakal | Good News : कोरोना रुग्णांसाठी 'माणदेशी'चा श्वास; गरजूंसाठी मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

Mandeshi Foundation

Good News : कोरोना रुग्णांसाठी 'माणदेशी'चा श्वास; गरजूंसाठी मदतीचा हात

sakal_logo
By
सल्लाउदीन चाेपदार

म्हसवड (सातारा) : राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेची सध्याची परिस्थिती पाहून कोविड रुग्णांना ऑक्‍सिजनची नितांत गरज पाहता माणदेशी फाउंडेशनने (Mandeshi Foundation) ऑक्‍सिजन बॅंक (Oxigen Bank) सुरू केली आहे. गरजू रुग्णास त्यांच्या घरीच सात दिवस मोफत ऑक्‍सिजन (Oxygen) देण्याचा उपक्रम सुरू केल्याची माहिती माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा (President Prabhat Sinha) यांनी दिली. (Free Oxygen Help From Mandeshi Foundation For Corona Patients Satara News)

सध्याच्या कोरोना साथीत माणदेशी फाउंडेशन कोरोना रुग्णासाठी जे काही करता येईल ते सर्व करत आहे. तालुक्‍यामध्ये पाहिले कोविड हॉस्पिटल गोंदवले येथे उभारले आहे, तसेच सातारा येथील जम्बो हॉस्पिटला व्हेंटिलेटर दिले. जिल्हाधिकाऱ्यांना पीपीई किट देण्याचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मास्क व गरजूंना जीवनाश्‍यक वस्तूंचे किटचेही वाटप केले आहे.

हेही वाचा: 'मी माझे कर्तव्य पार पाडले, आता उच्च न्यायालयात ठरेल'

माण तालुक्‍यामधील कोविड रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी उकडलेल्या अंड्याचा नाष्टा, संत्री, मोसंबी, बदाम, काजू, केळी, खजूर वाटप व आता मोफत दोन वेळचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. रुग्णांसाठी हे सर्व करताना बाधितांची वाढत चाललेली संख्येमुळे ऑक्‍सिजन बेडची होत असलेली गैरसोय पाहता माणदेशी फाउंडेशन आता सर्वांसाठी ऑक्‍सिजन बॅंक सुरू केली आहे. बाधित रुग्णांना ऑक्‍सिजन गरज आहे; परंतु उपचारास कोठेही बेड उपलब्ध होत नाही. अशा प्रत्येक रुग्णांना ऑक्‍सिजन कॉन्सन्टेटर सात दिवसांसाठी मोफत देण्यात येणार असून, या उपक्रमाचा गरजू रुग्णांनी म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशन कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे.

शिवसेनेच्या मंत्र्याने भाजपच्या माजी मंत्र्याला दिले आव्हान

Free Oxygen Help From Mandeshi Foundation For Corona Patients Satara News

loading image
go to top