esakal | शिवसेनेच्या मंत्र्याने भाजपच्या माजी राज्यमंत्र्याला दिले आव्हान, समाेरा समाेर या!
sakal

बोलून बातमी शोधा

shanbhuraj desai

शिवसेनेच्या मंत्र्याने भाजपच्या माजी मंत्र्याला दिले आव्हान

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aghadi) चक्रीवादळात (cyclone) झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करावी, असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्याचा समाचार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. माध्यमांशी बाेलताना देसाईंनी खाेत यांना शेतक-यांसाठी तुम्ही आणि केंद्र सरकारने काय केले याची समोरा समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हानच देऊन टाकले. shambhuraj-desai-challenges-sadabhau-khot-satara-political-news

मंंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकार शेतक-यांसाठी काय करीत आहे याची पूरेशी माहिती यापुर्वी राज्याचे कृषी राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिलेल्या सदाभाऊ खोत यांना माहित नाही या गोष्टीची किव करावीशी वाटते. केवळ अपुऱ्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे योग्य नाही असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: 'मी माझे कर्तव्य पार पाडले, आता उच्च न्यायालयात ठरेल'

देसाई म्हणाले काेविड 19 या अभूतपुर्व संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील त्यांचे भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे. त्याकडे त्यांचे लक्ष नाही बहुधा. ज्या पक्षाचे तुम्ही माजी मंत्री राहिलात त्यांच्या निर्णयाने शेतक-यांचा ताेटा हाेत आहे हे त्यांनी खरंतर जाणून घेणे आवश्यक आहे. त्या उलट शेतक-यांसाठी झटणा-या महाराष्ट्र सरकारवर ते टीका करत आहेत.

शंभूराज देसाई म्हणाले, मला या गोष्टीची किव येते की कृषी खात्याचे राज्यमंत्री पद सदाभाऊ खोत यांनी सांभाळलेले आहे. त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे योग्य नाही. सर्वात मोठी कर्जमूक्तीची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकाने राबविली आहे.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. यातून २२ हजार कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. विविध वादळे असून देत किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो झालेल्या नुकसानी बद्दल राज्य सरकरच्या तिजोरीतून मदत करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.

सदाभाऊंनी समोरा समोर यावे, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात किती मदत झाली याची चर्चा करु. मी महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून कधीही तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. सदाभाऊंना देसाईंनी दिलेले खूले आव्हान ते स्विकारतात का हे आता पहावे लागणार.

ब्लाॅग वाचा

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण

loading image
go to top