मैत्री असावी तर अशी! अपघातात मित्र कायमचा गमावला; पण..

Pankaj Ghadge Birthday
Pankaj Ghadge Birthdayesakal
Summary

वाढदिवसाला पंकज नसल्याची रुखरुख मित्राच्या मनात होती. कित्येक आठवणींचे काहूर मनात माजले होते.

सातारा : फत्यापूर (ता. सातारा) येथील तरुण पंकज घाडगेचा (Pankaj Ghadge) पाच महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी पंकजचा वाढदिवस असताना तो आपल्यात नसल्याने मित्रांच्या मनात दु:ख दाटून आले होते. आठवणी व दु:खाला मोकळे करण्यासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) खेड-चिपळूण (Khed-Chiplun) या अपघातग्रस्त ठिकाणी १५० किलोमीटर जाऊन चार मित्रांनी पंकजचा वाढदिवस साजरा करून अश्रूं‍ना वाट मोकळी करून दिली.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास पंकज घाडगे व इतर काही तरुण पर्यटनासाठी दापोलीला गेले होते. त्या ठिकाणाहून माघारी येताना मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. गावात शिवजयंती, शिवराज्यभिषेक दिन व इतर सर्व कार्यक्रमात अग्रेसर राहून काम करत असल्याने पंकज याचा मित्र परिवार मोठा होता. दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. मात्र, यंदा पाच जूनला वाढदिवसाला पंकज नसल्याची रुखरुख मित्राच्या मनात होती. कित्येक आठवणींचे काहूर मनात माजले होते.

Pankaj Ghadge Birthday
Rahul Tewatia च्या हृदयावर राज्य करणारी 'ही' सुंदर महिला आहे तरी कोण?

दरवर्षीच्या वाढदिवसाचे फोटो, केक कापताना केलेल्‍या जल्लोषाच्या केवळ आठवणी राहिल्या होत्या. मित्रांच्या मनात दाटलेल्या आठवणी मोकळ्या करण्यासाठी दीपक घाडगे, राहुल घाडगे, संकेत शिंदे, उदय घाडगे यांनी अपघातस्थळी जाऊन केक कापत पाणावलेल्या डोळ्यांनी पंकजचा वाढदिवस साजरा केला. पंकजच्या आवडीचे पदार्थही त्या ठिकाणी ठेऊन ‘हॅपी बर्थडे पंकजभाऊ’ अशा शुभेच्छा देत मनात फक्त आठवणी सामावून माघारी फिरले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com