धाडसी बसचालकाचे गोंदवलेकरांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

गोंदवले - गेल्या तीन महिन्यांपूर्वी मद्यधुंद कंटेनर चालकाचा अवतार पाहून अनर्थ टाळण्यासाठी पाठलाग करत लोकांना सतर्क करणारे एसटी चालक आनंदराव यादव यांच्या धाडसाचे गोंदवलेकरांनी कौतुक केले. या शाबासकीने ते भारावून गेले.

गोंदवले - गेल्या तीन महिन्यांपूर्वी मद्यधुंद कंटेनर चालकाचा अवतार पाहून अनर्थ टाळण्यासाठी पाठलाग करत लोकांना सतर्क करणारे एसटी चालक आनंदराव यादव यांच्या धाडसाचे गोंदवलेकरांनी कौतुक केले. या शाबासकीने ते भारावून गेले.

जुलै महिन्यात आषाढी एकादशीला म्हसवडकडून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने अनेक वाहनांना ठोकर दिली होती. मद्यधुंद अवस्थेतील या चालकाने पंढरपूरकडे निघालेल्या बसला गोंदवले खुर्दजवळ धडक दिली होती. त्याला बसचालक आनंदराव यादव यांनी थांबविण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, तो तसाच वेगाने कंटेनर घेवून निघाला होता. पुढील  अनर्थ टाळण्यासाठी यादव यांनी कंटेनरचा पाठलाग केला. कंटेनरच्या पुढे येवून त्यांनी कंटेनर चालकाला थांबविण्याचा प्रयत्नही केला. गोंदवल्यात येवून लोकांना सतर्क करून त्यांनी पुन्हा कंटेनर चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही कंटेनर चालकाने आणखी दोन वाहनांना ठोकर देऊन दहिवडीकडे धूम ठोकली होती. त्यानंतर गोंदवल्यातील तरुणांच्या मदतीने दहिवडीत कंटेनर थांबविण्यात यश मिळवले.

स्वतःचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या बसचालकाच्या धाडसाची दखल गोंदवले बुद्रुकच्या ग्रामपंचायतीने घेतली. उपसरपंच संजय माने यांच्या हस्ते श्री. यादव यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच आश्विनी कट्टे, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondawale news bus driver honor