वाणाचा खर्च टाळून निराधार मुलींना शैक्षणिक साहित्य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

टाकरवण येथील तनिष्कासह महिला बचत गटांनी घेतला पुढाकार 
टाकरवण : वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, त्यांना आधार मिळावा, असे "सकाळ माध्यम समूहा'च्या "तनिष्का' स्त्रीप्रतिष्ठा अभियानातील सदस्यांना मनोमनी वाटते. त्यांनी तशी चर्चाही केली होती. प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले. त्यासाठी टाकरवण येथील महिला बचत गट धावून आले. 

येथील माध्यमिक विद्यालयातील निराधार विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर चालू शैक्षणिक वर्षासाठी "तनिष्का' सदस्यांसह गावातील महिला बचत गटांनी दत्तक घेतले. विद्यार्थी आनंदले. तनिष्का व महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गुरुवारी (ता.27) हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला सक्षमीकरणाबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वाण म्हणून देण्यात येणाऱ्या वस्तूंवर होणारा खर्च टाळून तनिष्का सदस्यांनी निराधार मुलींना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनाबाई कोरडे होत्या, तर महिला आर्थिक विकास महामंडळाचे अनंतराव खेत्रे, साळंके, वैशाली नाईकनवरे, नंदिनी हिंगमिरे, प्रल्हाद कुटे, वशिम पटेल, गणपतराव आरबे, डॉ. नवले, जंगबहाद्दर पटेल आदी प्रमुख पाहुणे होते. 

वडील किंवा आई-वडिलांचे छत्र नाही, अशा विद्यार्थ्यांना पालकत्वाचा आधार देता येईल, का यावर "तनिष्का'च्या येथील सदस्या सविता खरात, ज्योती नवले, नंदा गायकवाड, विनीता शिंदे यांनी गटचर्चा घडवून आणली. पालकत्व हरपलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून शैक्षणिक साहित्य खरेदी केले. त्यानुसार गुरुवारी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी प्रल्हाद कुटे व अनंतराव खेत्रे यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले. या 
वेळी सविता खरात, ज्योती नवले, नंदा गायकवाड, विनीता शिंदे, सरोज ठोसर, आश्‍विनी तौर, योगीता तौर, इंद्रायणी शिंदे, सुनीता खुळे, सुनीता भुंबे, शोभा गेंदले, सरस्वती लंगे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण चव्हाण यांनी केले, तर आभार सौ, संगीता सातपुते यांनी मानले. 

Web Title: grocery bill avoid and this amount give social causes