अपंगत्वावर मात करून युवकाने मिळविला रोजगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

किल्लेधारूर - तालुक्‍यातील रेपेवाडी येथील दोन्ही पायांनी अपंग असलेले सर्जेराव रेपे (वय ३५) हे दहा वर्षांपासून आठवडे बाजार असेल तेथे जाऊन घड्याळ दुरुस्तीचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. 

किल्लेधारूर - तालुक्‍यातील रेपेवाडी येथील दोन्ही पायांनी अपंग असलेले सर्जेराव रेपे (वय ३५) हे दहा वर्षांपासून आठवडे बाजार असेल तेथे जाऊन घड्याळ दुरुस्तीचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. 

शासनाच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. शरीर धडधाकट असताना अपंगत्वाचे खोटे दाखले घेऊन त्याद्वारे अनेक योजनांचा लाभ घेऊन अपंगत्वाचा निधी लाटणाऱ्यांच्या डोळ्यांत सर्जेराव रेपे यांचे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन घातल्यासारखे आहे. तालुक्‍यातील डोंगरी भागातील अंजनडोह ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रेपेवाडी येथे त्यांना सात एकर डोंगराळ जमीन आहे. तोच त्यांचा खरा आधार आहे. सोबतच घड्याळ दुरुस्ती व विक्री करून मिळणारे चार पैसे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

Web Title: handicap sarjerao repe start own business story