उच्चशिक्षणाची कवाडे प्रणितासाठी खुली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

राजापूर - दहावीला ९२ टक्के गुण मिळविलेली प्रणिता घरच्या प्रतिकूल आर्थिक स्थितीमुळे उच्चशिक्षणाला आता वंचित राहणार नाही. ‘माय राजापूर’ संस्थेसह अनेक दानशूर व्यक्तींनी तिला हात दिल्याने तिला उच्चशिक्षणाची कवाडे खुली झाली. 

शिक्षणासाठी रोजची सुमारे दहा कि.मी.ची पायपीट, कोणताही खासगी क्‍लास नसतानाही जिद्द, मेहनतीच्या जोरावर दहावीला कोंडतिवरे येथील प्रणिता सुरेश डिके हिने ९२ टक्के गुण मिळविले.उच्चशिक्षण घेण्याच्या ध्येयाने प्रणिताने घरच्या प्रतिकूल परिस्थितीचे कोणतेही भांडवल न करता ध्येयाला जिद्द आणि मेहनतीची जोड देत दहावीत ९२ टक्के मिळविले. अनेक निराधारांची ‘माय’ बनलेल्या माय राजापूर या संस्थेला प्रणिताची समस्या समजली. संस्थेने तिला दहा हजार रुपयांची मदत केली. 

संस्थेला संजय डांगे, सूर्यकांत सागवेकर, नाथाशेठ गांधी, शेखर गोवळकर, विलास गोरे, संदीप देशपांडे आदींनी सहकार्य केले. संस्थेचे चंद्रशेखर सिनकर, संदीप देशपांडे, नरेश दसवंत, विलास गोरे, सुधा चव्हाण आदींनी प्रणिताकडे रक्कम सुपूर्द केली. वाटूळ येथील करसल्लागार मोहन सावंत यांनीही पाच हजार रुपयांची मदत केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High education quotes open for pranita

टॅग्स