खुशी परमार हिला "मानद डॉक्‍टरेट' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे-  जलतरणपटू खुशी पोर्णिमा परमार (वय 14 वर्षे) हिला "वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी'तर्फे "मानद डॉक्‍टरेट' जाहीर झाली आहे. खुशीने एशिया बुक, तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये सात, युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन, यंग ऍचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये तीन विक्रम नोंदविले आहेत. त्याची दखल घेऊन तिला ही पदवी जाहीर झाली आहे, अशी माहिती विघ्नहर्ता मित्रमंडळाचे अध्यक्ष ऍड. प्रशांत सुगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

खुशी महर्षीनगर येथील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये 9 वीच्या वर्गात शिकते. येत्या रविवारी (ता. 5) फरिदाबाद, हरियाना येथे होणाऱ्या समारंभात खुशीला  "मानद डॉक्‍टरेट' प्रदान करण्यात येणार आहे. खुशीने 2014 मध्ये कोल्हापूर शहरात कागल येथील तलावात "लेक वाचवा, लेक शिकवा' अभियानांतर्गत सलग 6 तास 32 मिनिटे 10 सेकंद पोहण्याचा विक्रम केला. डिसेंबर 2014 मध्ये सर्वांत लहान वयात (12 वर्षे 1 महिना) आशिया खंडातील "ओपन वॉटर स्क्‍युबा डायव्हर' होण्याचा मान मिळवला. तसेच, मे 2015 मध्ये "मुली निर्भय असतात' या उपक्रमांतर्गत मोटारसायकलवरून 3 सेकंदात 573 ट्यूबलाइट फोडण्याचा धाडसी विक्रम केला. एप्रिल 2016 मध्ये गोवा येथे एकूण 11 तास 30 मिनिटे "ओपन सी वॉटर स्क्‍युबा डायव्हिंग' करून "लॉंगेस्ट स्क्‍युबा डायव्हिंग इन अ वीक' हा विक्रम केला. याखेरीज खुशीने अनेक सागरी टप्पे पोहून पार केले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khushi parmar