एकुलता पुत्र गमावल्यावरही पाच जणांना दिले नवजीवन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

प्रदीप वाकचौरे कुटुंबीयांकडून यकृत, डोळे आणि किडनीदान

नाशिक - दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला शिवम प्रदीप वाकचौरे या एकुलत्या मुलाला काल (ता.25) प्राण गमवावा लागला. मात्र, गंभीर आजारी असलेल्या पित्याच्या सहृदयतेने अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ पाच जणांना नवजीवन मिळाले. आज पुणे, नाशिक येथे या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सर्वांनीच समाधानाचा श्‍वास घेतला.

त्र्यंबकेश्‍वरजवळच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या शिवम वाकचौरे (वय 19) याला रविवारी त्र्यंबक रोडवर दुचाकीच्या अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी सिक्‍स सिग्मा रुग्णालयात दाखल केले असता, तो "ब्रेनडेड' झाल्याचे निष्पन्न झाले. या वेळी डॉक्‍टरांनी पालकांना परिस्थिती सांगून अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. स्वतः उपचार घेत असलेले शिवमचे वडील प्रदीप वाकचौरे, बहीण रिया यांनी कुटुंबातील एकुलता मुलगा गमावल्याचे दुःख बाजूला सारून त्याला होकार दिला. त्यानंतर हृषीकेश हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. श्‍याम पगार, डॉ. संजय रकिबे, डॉ. प्रणव छाजेड यांनी तातडीने कार्यवाही करीत त्याचे यकृत पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयास, दोन डोळे नाशिकच्या डॉ. प्राची पवार यांच्या मणिशंकर आय हॉस्पिटलच्या दोन रुग्णांना दिले. हृषीकेश रुग्णालयात दोन जणांवर किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदान केलेल्या कुटुंबीयांसह सिक्‍स सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील पारख, डॉ. विशाखा जहागीरदार व डॉ. अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: lafe saving by pradip wackchaure family