
सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर व रायगड या सात जिल्ह्यांचे बँकेचे कार्यक्षेत्र आहे.
'माणदेशी'ने जपली बांधिलकी! 25 हजार महिलांना देणार मोफत लस
म्हसवड (सातारा) : माणदेशी महिला सहकारी बँक व माणदेशी फाउंडेशन (Mandeshi Foundation) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील २५ हजार महिलांना मोफत कोविड- १९ चे लसीकरण (Corona Vaccination) केले जाणार असल्याची माहिती बँक व फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीमती सिन्हा म्हणाल्या, “महिला सबलीकरण व्हावे या उद्देशाने २४ वर्षांपूर्वी ११ ऑगस्ट १९९७ रोजी बँकेची स्थापना करण्यात आली. डिजिटल क्रांतीच्या युगातही बँक सक्षमपणे काम करत आहे. यंदा २५ व्या वर्षांत बँक पदार्पण करत आहे. कोविड- १९ च्या प्रसाराला आळा घालता यावा, यासाठी माणदेशी महिला सहकारी बँक व माणदेशी फाउंडेशन ग्रामीण भागातील २५ हजार महिलांचे लसीकरण करणार आहे.’’
सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर व रायगड या सात जिल्ह्यांचे बँकेचे कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत बँकेने शाखा म्हसवड, गोंदवले बुद्रुक, वडूज, दहिवडी, सातारा, धायरी व पनवेल, कामोठे येथे एटीएम सुविधांसह बँकेची शाखा सुरू केल्या आहेत. बँकेने सुमारे एक लाखापेक्षा जास्त महिला खातेदारांना कर्जवाटप केले आहे. बँकेच्या ठेवी १२१ कोटींच्या वर आहेत. महिलांच्या नावावर स्थावर मालमत्ता असल्यास संबंधित खातेदाराला एक टक्का व्याजाची सवलत दिली जाते.
हेही वाचा: मानलं! दुर्घटनेतील 13 अनाथ बालकांचं पालकत्व 'भोई'ने स्वीकारलं
आठवडा बाजार करणाऱ्या महिलांसाठी जागेवरच कर्जाची उपलब्धता, आठवडे बाजार करणाऱ्या व जे. एल. जी. कर्जदार महिलांसाठी आयुर्विमा संरक्षण आदी बँकेची विशेष वैशिष्ट्ये आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार माणदेशी महिला सहकारी बँकेने ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापित असणारी बँक’ असा नावलौकिक मिळवला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. वर्ल्ड इकॉनॉमी फोरमचे २०१८ मध्ये को- चेअर हे पद भूषविण्याची संधी मिळाली. ब्रिक्स बँकेत आर्थिक विकास समितीचे अध्यक्षपदाची संधी मिळाली होती, असेही सिन्हा यांनी नमूद केले.
हेही वाचा: 'फॅबिफ्लू'च्या सरसकट वापरावर नियंत्रण; साताऱ्यात महत्वाचा निर्णय
व्यवसाय प्रतिनिधींची नेमणूक करणार
माणदेशी बँकेस पश्चिम महाराष्ट्र महिला विभागातून वार्षिक अहवाल स्पर्धा प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्यमहोत्सवी वर्षात बँक १०० डिजिटल बीसी (व्यवसाय प्रतिनिधींची) नेमणूक करणार असल्यामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी दिली.
Web Title: Mandeshi Foundation To Provide Free Corona Vaccination To 25 Thousand Women
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..