मालदेवमधील शाळेसाठी मुंबईकर विद्यार्थ्यांची मदत

सुनील शेडगे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

नागठाणे - विद्यार्थ्यांत ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या मालदेव (ता. सातारा) या दुर्गम भागातील शाळेत मुंबईतील ‘ॲग्नेल पॉलिटेक्‍निक’च्या प्रयत्नाने खराखुरा प्रकाश पडला. त्यासाठी ’ॲग्नेल’च्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ‘सोलर लाइट पॅनेल’ची भेट शाळेस दिली.

नागठाणे - विद्यार्थ्यांत ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या मालदेव (ता. सातारा) या दुर्गम भागातील शाळेत मुंबईतील ‘ॲग्नेल पॉलिटेक्‍निक’च्या प्रयत्नाने खराखुरा प्रकाश पडला. त्यासाठी ’ॲग्नेल’च्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ‘सोलर लाइट पॅनेल’ची भेट शाळेस दिली.

मालदेव हे ठोसेघरनजीक असलेले दुर्गम गाव. भोवताली दाट जंगल. गावातील प्राथमिक शाळेसमोर विजेची समस्या होती. अशा स्थितीत सामाजिक कार्यात सहभागी असणारे साताऱ्यातील ’केबीपी’ कॉलेजचे प्रा. विजय निंबाळकर शाळेच्या मदतीला धावून आले. त्यासाठी वाशी (मुंबई) येथील ’ॲग्नेल पॉलिटेक्‍निक’च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत स्वतः ‘सोलर लाइट सिस्टिम’ तयार केली. ती शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमास ‘ॲग्नेल’चे व्यवस्थापकीय संचालक फादर आयव्हीन अल्मेडा, प्रा. प्रेमकुमार जोशी, प्रा. मीनल, प्रा. निंबाळकर, सरपंच महादेव सुतार, उपसरपंच जयराम चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

ही यंत्रणा तयार करणारे ‘ॲग्नेल’चे दहा विद्यार्थीही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. मुख्याध्यापक केशव अलट यांनी स्वागत केले. समीर वायदंडे यांनी आभार मानले. 

अखंड व विनाखर्च वीजपुरवठा
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील वीज समस्येच्या पार्श्‍वभूमीवर शाश्‍वत अन्‌ विनामूल्य वीजपुरवठा व्हावा, या हेतूने ‘ॲग्नेल पॉलिटेक्‍निक’च्या विद्यार्थ्यांनी ही यंत्रणा विकसित केली असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. ही यंत्रणा शाळेत बसवण्यात आल्याने शाळेत अखंड व विनाखर्च वीजपुरवठा होणार आहे.

Web Title: marathi news Maldev School mumbai help student nagthane

टॅग्स