‘मस्ती की पाठशाला’तून शिक्षणाची वाट 

‘मस्ती की पाठशाला’तून शिक्षणाची वाट 

पुणे - ‘‘मला दीड वर्षापूर्वी लिहिता-वाचता येत नव्हते. आता मी माझी सही करू शकते. माझ्या मुलांसमवेत शिकत असल्याने शिकण्याची प्रेरणा मिळते. ‘मस्ती की पाठशाला’ या शाळेत शिकून रोजगाराची चांगली संधी मिळविण्याची इच्छा आहे,’’ असे सांगत होत्या इंदू चौहान. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजची रहिवासी असून, त्यांचे पती रावेतमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत. 

इंदू चौहान यांनी उत्तर प्रदेशात शाळेचे तोंडही कधी बघितले नव्हते. गेल्या दहा वर्षांपासून त्या पतीसमवेत रावेतमध्ये राहतात. ‘मस्ती की पाठशाला’ या शाळेत मुलांसमवेत त्यांच्या काही माताही शिक्षणाचे धडे गिरवू लागल्या आहेत. या शाळेत अशाप्रकारे सध्या पाच माता शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त दोन मातांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या आता शाळेत इंग्रजी शिकू लागल्या आहेत. इंदू म्हणाल्या, ‘‘मला शिक्षणाची खूप आवड आहे. या शाळेमुळे माझ्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.’’ 

मूना चौहान म्हणाले, ‘‘दीड वर्षापूर्वी मला काहीही येत नव्हते. माझी मुले महापालिकेच्या शाळेत शिकतात. तेथे पालक सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सही करण्याची वेळ आली की अंगठा पुढे करीत होते. आता मात्र स्वत:च्या नावापुढे सही करता येते.’’

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या दोघी केंद्र सरकारच्या कौशल्य विकसन उपक्रमाअंतर्गत अडीच महिन्यांचे ‘ज्येष्ठांची काळजी कशी घ्यावी’, या विषयावर प्रशिक्षणास मार्चपासून सुरवात करतील. त्यामुळे त्यांना परिसरातील मोठ्या निवासी गृहरचना संस्थांमधील ज्येष्ठांची सेवा करण्याची रोजगार संधी उपलब्ध होईल. 
- प्राजक्ता रुद्रवार, समन्वयक व शिक्षिका, मस्ती की पाठशाला, रावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com