गणेशमूर्तीला आकार देणारे विद्यार्थी 

संतोष भिसे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मिरज - भक्त गणेशाला अनेक रूपांत पाहतात. कल्पनेनुसार बप्पा साकारतात. उत्सवात सजवून-धजवून 11 दिवस आराधना करतात. परंतु जन्मापासून ज्यांनी जगच पाहिले नाही अशांना तो कसा कळणार ? तो त्यांनी जाणला वाचनातून. स्पर्शज्ञानातून ! त्यातून बप्पाची अनेकविध रूपे कल्पनेतून साकारली. दृष्टी नसल्याने त्यांच्यासाठी तो निराकार आहे. पण थक्क करणाऱ्या कल्पनाशक्तीतून विघ्नहर्त्याला आकार देण्याची किमया त्यांनी साधली. मिरज औद्योगिक वसाहतीत लायन्स नॅब संस्थेच्या अंध मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेली बप्पाची अनेक रूपे लक्ष वेधून घेताहेत. भक्तांना आकर्षित करीत आहेत. 

नॅब संस्थेच्यावतीने औद्योगिक वसाहतीत अंधांसाठी शाळा चालवली जाते. शालेय उपक्रमांतर्गत तेथे दरवर्षी गणेशमूर्ती तयार करवून घेतल्या जातात. विविध उपक्रमांत नेहमी पुढाकार घेणाऱ्या राजेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना ही कला शिकवली. सध्या पंचवीसहून अधिक चित्तवेधक गणेशमूर्ती तयार आहेत. समाजातील "जाणते' व "डोळस' भक्त शाळेला देणगीमूल्य देऊन या मूर्ती घरी प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जातात. काही वर्षांत मागणी वाढत आहे. शाळा आणि मुलांच्या उपक्रमशीलतेला दाद देण्यासाठी समाज सक्रिय पुढाकार घेत असल्याचे सुचिन्ह पहायला मिळते आहे. 

प्रभारी मुख्याध्यापक गोरख कुचेकर म्हणाले,""गणेशमूर्ती कशी असते हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगणे सुरवातीला महत्त्वाचे होते. त्यांच्यातील "मानसिक अंधत्व' नाहीसे करण्यात यशस्वी झालोय. गणेशाचे अवयव प्रमाणबद्धतेत साकारणे विद्यार्थ्यांना जमत नव्हते. काही अंशतः अंध विद्यार्थ्यांनी उपक्रम यशस्वी केला. कालांतराने मूर्तींची संख्या वाढू लागल्याने साचा वापरायला सुरवात केली. सध्या अनेक लहान-मोठ्या मूर्ती बनवल्यात. विद्यार्थ्यांना रंगज्ञान पुरसे नसल्याने बहुतांश मूर्ती एकाच रंगांनी रंगवतो. काही मोजक्‍या मूर्ती विविध रंग आणि दागिन्यांनी सजवतो. पर्यावरणाचे भान राखत शाडूच्याच मूर्ती बनवल्या जातात. रंगही पर्यावरणस्नेहीच असतात. मूर्तींना मागणी वाढल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला आहे. 

मुस्लिम कर्मचाऱ्यांचा उत्सव 
अंध मुलांच्या शाळेत गणेशोत्सव उत्साहात होतो. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना केली जाते. शाळा व लायन्स नॅबमधील सर्व मुस्लिम कर्मचारी वर्गणी संकलित करून आणखी एक मोठी मूर्ती देतात. सात दिवस उत्सवात भाग घेतात. 

Web Title: miraj news ganesh festival student

टॅग्स