कार वॉश करता करता चमकविले भविष्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

नागपूर - घरची प्रतिकूल परिस्थिती, नाहीसे झालेले पितृछत्र आणि होणारे शैक्षणिक  नुकसान यावर मात करत शुभम अनिल वाघमारे या युवकाने आज यशाचा पल्ला गाठला आहे. कार वॉशिंगच्या माध्यमातून स्वत:चा उदरनिर्वाह करत त्याने व्यावसायिक होण्याचे स्वप्नही साकारले. 

नागपूर - घरची प्रतिकूल परिस्थिती, नाहीसे झालेले पितृछत्र आणि होणारे शैक्षणिक  नुकसान यावर मात करत शुभम अनिल वाघमारे या युवकाने आज यशाचा पल्ला गाठला आहे. कार वॉशिंगच्या माध्यमातून स्वत:चा उदरनिर्वाह करत त्याने व्यावसायिक होण्याचे स्वप्नही साकारले. 

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये बीए प्रथम वर्षाला असलेल्या शुभमने आठवीत असताना रोजगाराची कास धरली. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे शुभमचे शिक्षण अर्धवट राहण्याची नामुष्की ओढवली होती. यामुळे त्याने आठवीत शेजारी राहणाऱ्या मित्राकडे कार वॉशिंग बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मेहनत आणि जिद्दीच्या भरोशावर त्याने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. शुभम काही वर्षांतच ॲड. मनीष गुप्ता यांच्याकडे ऑफिस बॉय कम कार वॉशर म्हणून काम करू लागला. त्यांच्या ओळखीतून त्याला नवनवीन ग्राहक मिळू लागले. आजघडीला त्याच्याकडे महिन्याकाठी १६ ग्राहक आहेत. आदित्य कार वॉशिंग ग्रुप या नावाने सुरू केलेला हा व्यवसाय आता तग धरू लागला आहे. स्वयंरोजगारांच्या भरोशावर शुभम स्वत:चे आणि लहान भाऊ आदित्य याचे शिक्षण पूर्ण करीत आहे. याशिवाय घराचा डोलारादेखील त्याने उत्तमरीत्या सांभाळला आहे. 

सात वर्षांच्या या छोटेखानी व्यवसायात शुभमने संपूर्ण शहरात स्वत:चे ग्राहक तयार केले आहेत. केवळ उत्तम संवाद कौशल्य, कामात असलेली प्रामाणिकता आणि कधीही बोलावल्यावर ग्राहकाला नाराज न करण्याची कला यामुळे त्याची प्रगती जोमाने सुरू आहे. स्वत:च्या प्रवासावर बोलताना शुभम म्हणाला, परिस्थितीमुळे कमी वयात नोकरी शोधावी लागली. मात्र, या परिस्थितीमुळेच आज सर्व काही चांगले सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news Bright future with car wash