नागपूर ते वाघा बॉर्डर व्हाया एमपी

Ritesh-and-Sahil
Ritesh-and-Sahil

नागपूर - सैन्यभरतीबद्दल युवकांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात देशभावना निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने उपराजधानीतील दोन युवक सायकलने देशभ्रमणाला निघाले आहेत. नागपूर ते वाघा बॉर्डर असा जवळपास पाच हजार किमीचा प्रवास करणार असून, या सायकल अभियानादरम्यान ते सामाजिक संदेशही देणार आहेत. 

रितेश भोयर आणि साहिल धोंगळे हे ते साहसवीर आहेत. आजची तरुणाई धूम्रपान तसेच अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यामुळे यासंदर्भात देशभर जनजागृती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठीच त्यांनी हे सायकल अभियान हाती घेतले आहे. क्रीडाभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित या ४५ दिवसांच्या साहसी मोहिमेची सुरुवात २१ ऑक्‍टोबरला झीरो माइल्सपासून झाली. नागपूर ते वाघा बॉर्डर आणि परत नागपूर असा जवळपास पाच हजार किलोमीटरचा हा सायकल प्रवास राहणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाना, पंजाब, राजस्थान या राज्यांतून भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरला पोहोचेल. त्यानंतर लगेच नागपूरकडे परततील. दिवसभरात दीडशे किमी सायकल चालविल्यानंतर सायंकाळी ठरलेल्या ठिकाणी मुक्‍काम करतील. 

या मोहिमेदरम्यान ते शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणींना धूम्रपान आणि अमली पदार्थाचे नुकसान सांगून, त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करणार आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये असलेले मोबाईलचे वेड, ‘ॲडव्हेंचर स्पोर्टस’ आणि ‘सायकलिंग’चेही फायदे-तोटे सांगणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, युवा पिढीला सैन्यामध्ये भरती होण्यासाठी ते प्रेरित करणार आहेत. नागपूरकर तरुणांच्या या साहसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माझ्या वडिलांनी १७ वर्षे भारतीय सैन्यात नोकरी केली. त्यामुळे देशाभिमान मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तरुणांनीही मोठ्या संख्येने सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी, असे मला वाटते. आमच्या सायकल मोहिमेमागचा हाच मुख्य हेतू आहे.
- रितेश भोयर (सायकलपटू)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com