ओगलेवाडी ते हिथ्रो विमानतळ...!

मुकुंद भट
बुधवार, 10 मे 2017

शहाजी कोळेकरांच्या जिद्दीचा प्रवास; चिकाटीतून मिळवले उज्ज्वल यश
ओगलेवाडी - एअर इंडियाच्या लंडन येथील ‘हिथ्रो’ विमानतळावर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ते ग्लोबल एव्हिएशन सर्व्हिसेसच्या महाव्यवस्थापकपदावर काम करण्याची संधी मिळवणाऱ्या येथील शहाजी कोळेकरांची जिद्द वाखणण्याजोगी आहे. चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळविलेले यश नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

येथील एका कार्यक्रमास श्री. कोळेकर आले होते. त्यावेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला. कोळेकर यांचे शिक्षण कोळे, ओगलेवाडीत झाले.

महाविद्यालयीन शिक्षण कऱ्हाड व भिवंडीत झाले. कॉलेजमध्ये असताना राष्ट्रीय छात्र सेनेमुळे त्यांच्यात बदल झाला. सार्जंट, अंडर ऑफिसर, बेस्ट कॅडेटमुळे कॉलेजात ते ‘एनसीसी मॅन’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक, शॉर्ट सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात एलएलबी केले. एक जाहिरात पाहिली आणि त्यांना एअर इंडियाच्या विजिलून्स आणि सिक्‍युरिटी विभागात नोकरी मिळाली. एअर इंडियाच्या नोकरीतला नियमितपणा, शिस्त व प्रामाणिकपणामुळे लंडनसारख्या एअर पोर्टवर त्यांनी काम केले. जगातल्या अनेक मोठ्या एअर पोर्टवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विमानतळ व प्रवाशांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी होती. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसोबत परदेश दौरे करण्याचा योग आला. उत्कृष्ट सेवेबद्दल एअर इंडियाचे मेरिट ॲवॉर्ड मिळवले. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, राज्य वाहतूक प्रमुख पद्मनाभन यांचे मार्गदर्शन मिळाले. शहाजी कोळेकरांच्या यशस्वी वाटचालीत पत्नी संगीता व मुले अभिजित आणि सुहित यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 

नव्या पिढीने कोणत्याही क्षेत्रात निश्‍चित ध्येय ठेवावे. त्यासाठी प्रामाणिकपणा, मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवावी.
- शहाजी कोळेकर, महाव्यवस्थापक, ग्लोबल एव्हिएशन सर्व्हिसेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ogalewadi to heathrow airport