esakal | भारीच! लंडनस्थित जावई भारताच्या मदतीला; Oxygen साठी दिली तब्बल दहा लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Jain

भारीच! लंडनस्थित जावई भारताच्या मदतीला; Oxygen साठी दिली तब्बल दहा लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडचे व्यापारी अनिल शहा यांच्या लंडनस्थित (London) जावयाने भारतातील अक्षयपात्र संस्थेस ऑक्‍सिजन (Oxygen) निर्मितीसाठी दहा लाखांची देणगी दिली आहे. डॉ. अक्षय व नमिता जैन यांच्या औदार्याचे शहरात कौतुक होत आहे. (One Million Rupees For Oxygen From Akshay Jain Of London Satara News)

येथील व्यापारी अनिल शहा यांची मुलगी नमिता हिचा विवाह 20 वर्षांपूर्वी ठाणे येथील डॉ. अक्षय जैन (Akshay Jain) यांच्याशी झाला. डॉ. अक्षय हे लग्नापासून लंडनस्थित आहेत. ते बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे आई व वडील ठाण्यात असतात. वडील डॉ. अशोक व आई मंगलबेन यांनाही सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचा वारसा डॉ. अक्षय चालवत आहेत.

Tocilizumab Injection च्या काळजीने नातेवाईकांचे हृदय पिळवटून निघत आहे

डॉ. अक्षय यांनी भारतातील कोरोनाग्रस्तांना ऑक्‍सिजन गरज ओळखून केलेली मदत लाखमोलाची ठरते आहे. डॉ. अक्षय व नमिता यांनी 10 लाखांची मदत दिली. भारतातील ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांच्या मदतीच्या निर्धाराचे समाजात कौतुक होत आहे. दोघांनीही अक्षयपात्र संस्थेला 10 लाख रुपये देणगी दिली. लंडनमधील भारतीय मित्रांच्या साह्याने कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा त्यांचा मानस आहे.

आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

सामाजिक भान ठेवून ऑक्‍सिजनसाठी मदत करत आहोत. अनेक भारतीय नागरिक लंडनस्थित आहेत. त्यांच्याशीही चर्चा करून अजून काही मदत देता येते का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-डॉ. अक्षय जैन, लंडनस्थित भारतीय बालरोगतज्ज्ञ

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

One Million Rupees For Oxygen From Akshay Jain Of London Satara News

loading image
go to top