esakal | आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

बोलून बातमी शोधा

Police
आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दहा मे पर्यंत सातारा जिल्हयात निर्बंध कडक केले आहेत. थाेडक्यात जिल्हा लाॅकडाउन (Lockdown) केला आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आणि रुग्णालय व्यतरिक्त इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.

आज (मंगळवार) सकाळी सातपासून सातारा पाेलिस दलाने शहरातील विविध चाैकात रस्त्यांवर फिरणा-या नागरिकांची कसून तपासणी सुरु केली आहे. जे याेग्य कारण देत नाहीत प्रशासनाची फसवणुक करीत आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करु असे डीवायएसपी धीरज पाटील यांनी नमूद केले. (Satara Marathi News Lockdown Police Citizens)

हेही वाचा: पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश; साताऱ्यात कडक Lockdown, सर्व दुकाने बंद!

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साेमवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. लॉकडाउन असूनही वाढत चाललेली गर्दी रोखण्यासाठी तातडीने कडक निर्बंध लागू करण्याची सूचनाही दिल्या हाेत्या. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवे निर्बंध लागू केले.

हेही वाचा: अंतवडीत जलसंधारण तलावाचे काम युद्धपातळीवर; तालुक्यातील 385 एकर क्षेत्राला होणार 'लाभ'

हेही वाचा: साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! नव्या रेकॉर्डसह जिल्ह्यात 2502 बाधित, तर 36 जणांचा मृत्यू