दाताने तीर चालवतो ‘एकलव्य’!

नीलेश डाखोरे
रविवार, 20 मे 2018

विदर्भात अमरावती येथेच धनुर्विद्येचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. मात्र, मी परिस्थिती बदलविणार त्यातूनच नागपूर येथे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
- अभिषेक ठावरे 

नागपूर - अंगठ्याविनाही ‘एकलव्य’ सर्वोत्तम धनुर्धारी ठरला. पण एक हात अधू असेल तर. जिद्दीपुढे आकाश ठेंगणे म्हणतात. अभिषेक सुनील ठावरेचा एक हात अधू असतानाही दाताने प्रत्यंचा ओढत तो ‘आधुनिक एकलव्य’ झाला.

चिमुकल्या अभिषेकला तापात दिलेल्या चुकीच्या इंजेक्‍शनमुळे उजवा हात अधू झाला. तरीही तो शिकला. बी. कॉम. झाला. अशात धनुर्धर व तिरंदाजी प्रशिक्षक संदीप गवईंशी भेट झाली आणि येथूनच त्याचा धनुर्धर होण्याचा प्रवास सुरू झाला. सध्या तो महाराष्ट्र पोलिस दलातील कॉन्स्टेबल चंद्रकांत इलग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

भारतीय सराव संघासाठी देशभरातून निवडलेल्या सर्वोत्तम आठ धनुर्धरांमध्ये अभिषेकचा पाचवा क्रमांक लागतो. 

असामान्य कर्तृत्वाच्या बळावर केवळ दातांच्या साहाय्याने बाण सोडून अचूक लक्ष्य भेदणारा अभिषेक भारतातील पहिला ‘टीथ आर्चर’ बनला. २८ वर्षीय अभिषेकने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ४५ पेक्षा अधिक पदके मिळविलीत. आता तर तो सेलिब्रिटी झाला. ‘इंडियाज गॉज टॅलेेंट’मध्ये त्याला आंमत्रित  केले असून ‘इन्स्पायरिंग हिरो’ म्हणूनही त्‍याला  बोलविले जाते. 

कामगिरी 
२०१७ मध्ये चेन्नई येथील अखिल भारतीय खुल्या तिरंदाजी स्पर्धेत विशेष पुरस्कार 
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आठवा 
हैदराबाद येथील दिव्यांगांच्या वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग 
रोहतक येथील ‘पॅरा’स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व व ब्राँझपदक 
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग 
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागपूर धनुर्विद्या संघात निवड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story abhishek thavre