पुण्याच्या तरुणाची हवाई दलात ‘भरारी’

पुण्याच्या तरुणाची हवाई दलात ‘भरारी’

पुणे - एरंडवणा येथील कैलाश करमरकर या तेवीसवर्षीय अभियंत्याची भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ब्रॅंच’साठी निवड झाली आहे.  

हैदराबादमधील दुंदीगलच्या एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये ७४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला ‘फ्लाइंग ऑफिसर’ रॅंक मिळेल आणि तो भारतीय हवाई दलात वैमानिक होईल.

आई शैलजा करमरकर या त्याचा आणि त्याची बहीण कल्याणीचा सांभाळ करत आहेत. कैलाशचे शालेय शिक्षण डॉ. कलमाडी श्‍यामराव हायस्कूलमध्ये झाले असून, त्याने जून २०१७ मध्ये बी. ई. मेकॅनिकलमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले.

कोंढवा येथील सिंहगड ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग येथून त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्याची एका नामांकित कंपनीत त्याला काम करण्याची संधी मिळाली. ‘एअरफोर्स’चे मेरिट येईपर्यंत त्याने ती नोकरी केली. त्यानंतर त्याने फेब्रुवारी २०१७मध्ये ‘एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’ दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर गांधीनगर येथे एप्रिल २०१७ मध्ये एस. एस. बी. मुलाखत दिली. या परीक्षेद्वारे वैमानिक बनण्यासाठी देशभरातून केवळ अकरा तरुणांची निवड झाली असून, त्यात त्याचा समावेश आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आईला देतो. 

कैलाश याची ‘एनडीए’मध्ये जायची इच्छा असल्याने तो अकरावीपासूनच तयारीला लागला होता. एअरफोर्समध्ये वैमानिक होण्याचे स्वप्न तो दहावीपासून पाहत होता. एस. एस. बी. मुलाखतीसाठी त्याला लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com