निवृत्त प्राध्यापिकेच्या पुढाकाराने रत्नागिरीतील मुलींना मिळतेय शिक्षण 

नेत्वा धुरी 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी जिल्ह्यात महाविद्यालये दूर अंतरावर असल्यामुळे या भागातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींना शिकता यावे म्हणून मुंबईतील निवृत्त प्राध्यापिकेने या मुलींच्या शिक्षणाचे व्रत अंगिकारले आहे. 
मंडणगडनजीकच्या बानकोट या छोट्याशा गावातील मुली आज शिक्षणासाठी गावकुसाबाहेर जात नाहीत. बारावीपुढे शिक्षणासाठी बाहेर जावे लागत असल्याने मुलींसाठी शिक्षण बंद होते. वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याअगोदरच मुलींचे लग्न होते. मात्र शगुफ्ता पारकर यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून गावातच शिक्षण मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. 

बानकोटमधील मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी थेट गावातच डिजिटल शिक्षणाची सोय पारकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. या मुलींच्या शिक्षणाचा खर्चही त्याच उचलतात. या मुलींना मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षणाचा दाखला त्याच करून देतात. त्यासाठी कलिना संकुलात या मुलींची कागदपत्रे घेऊन येतात व स्टडी मटेरियल घेऊन पुन्हा गावी जातात. गावी डिजिटल लर्निंग वर्गातून त्यांनी रेकॉर्डेड व्याख्याने उपलब्ध करून दिली आहेत. शिवाय स्वखर्चातूनच या क्‍लासरूमसाठी एका प्राध्यापकाचीही नेमणूक केली आहे. विद्यार्थिनींना काही शंका आल्यास थेट प्रक्षेपणातून संबंधित विषयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणतात. मुल्लाह अहमद पारकर एज्युकेशन ट्रस्टच्या नावाने संस्था उभारून शगुफ्ता पारकर यांनी शिक्षणाचे हे अविरत कार्य सुरू केले आहे. 
गेल्या वर्षी मालाड येथील मैनादेवी बजाज इंटरनॅशनल स्कूलमधून निवृत्तीनंतर या कामी त्या पूर्णपणे लक्ष देत आहेत. गेल्या वर्षी आठ, तर यंदा पाच मुलींना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पारकर यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. त्यापैकी पहिल्या आठ मुली आता वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहेत. या वर्षी पाच मुलींसोबत एका मुलालाही पारकर यांनी याच पद्धतीने शिक्षणाची मदत केली आहे. 
परीक्षाकाळात विद्यापीठाकडून महाड येथे केंद्र उपलब्ध करून ठेवले आहे. मुलांच्या राहण्याची आणि खाण्याची सोयही त्याच करतात. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired profeser inishitive Rtnagiri girls Educate