भुकेल्यापर्यंत अन्न पोचवण्याचे व्रत

भुकेल्यापर्यंत अन्न पोचवण्याचे व्रत

कोल्हापूर -  प्रत्येक भुकेल्यापर्यंत अन्नाचा घास पोचवण्याचे व्रत घेऊन कोल्हापुरातही काम करत असलेल्या रॉबिनहूड आर्मीने दीड वर्षात सुमारे दोन लाख लोकांना अन्न दिले आहे. 
हे सेवाभावी काम करताना स्वत:चा वेळ, पैसा, प्रतिष्ठा याचा विचार न करता आणि जात, धर्म या पलीकडेही जाऊन हे काम करणारे सुमारे तीनशेहून अधिक मानवतेचे पुजारी संस्थेसाठी अहोरात्र झटत आहेत.

जेवण शिल्लक असलेला कॉल कोठूनही आला तरी ते तेथे पोहोचतात आणि आवश्‍यक असलेल्या ठिकाणी अन्न पोचविण्याचे काम हे रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक करतात. वाहन आणि पेट्रोलही स्वतःचेच; पण भुकेल्याच्या पोटात अन्नाचा घास पडावा, यासाठीच्या या धडपडीला सलामच करावा लागेल.

कोठे स्वतःचे ऑफिस नाही की जागा नाही. या तीनशे कार्यकर्त्यांचा सर्व संवाद चालतो सोशल मीडियावर आणि फोनवर. या रॉबिनहूड आर्मीचे मुख्य काम म्हणजे समारंभ, महाप्रसाद, हॉटेल तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमात शिल्लक राहिलेले जेवण गरजू व गरीब लोकापर्यंत पोचविणे. दीड 
वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना कोल्हापुरात झाली. 

या संस्थेत सर्व जातीधर्मातील उच्चविद्याविभूषित डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर समाजातील सर्व स्तरातील लोक, स्त्री-पुरुष सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने काम करत आहेत. कोल्हापूर शहरात आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख लोकांपर्यंत अन्न पोचवले आह. दररोज या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढत आहेत. त्यामुळे या आर्मीने एक हजार ड्राईव्ह पूर्ण 
केले आहेत. 

हे सर्व तरुण जात, धर्म, यांच्या पलीकडे जाऊन आपला व्यवसाय, प्रतिष्ठा, नोकरी, धंदा या सर्व गोष्टी बाजूला ठेवून गोरगरिबांना मदत करत आहेत. मुलांसोबत मुलीही खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. दिवाळी सणाच्या वळी सुमारे १२०० लोकांना फराळ वाटप करण्यात आला आहे. अनेकांनी आपल्या घरातील दिवाळीचा फराळ एखादा गरिबाच्याही मुखात पडू दे या भावनेतून हे फराळ रॉबिनहूड आर्मीकडे सुपूर्द केले. वनविभागासमोर चार दिवस आंदोलनासाठी बसलेल्या चांदोली येथील धरणग्रस्तांना तसेच सैन्य भरतीसाठी कोल्हापुरात आलेल्या एक हजार तरुणांना दररोज जेवण दिले जात आहे. 

१६ व १७ डिसेंबरला ब्लॅंकेट वाटप
येत्या दोन दिवसांत फूटपाथवर झोपणाऱ्या तसेच निराधारांना, ऊसतोडणी कामगारांनाही ब्लॅंकेट देण्याचा या संस्थेचा उपक्रम आहे. १४०० ब्लॅंकेटस देण्यात येणार आहेत. हुडहुडी भरायला लावणाऱ्या या थंडीत त्यामुळे निराधारांना रॉबिनहूड आर्मीकडून मायेची ऊब देण्याचा हा प्रयत्न आहे. कोल्हापुरात दीड वर्षातच या संस्थेचा कामाचा व्याप वाढत आहे. एका क्षणात तत्पर सेवा देण्यात रॉबिनहूड आर्मीचे स्वंयसेवक काकणभर चढच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com