आईच्या पुण्यतिथीची लाखची मदत मुख्यमंत्री निधीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

काहीजण स्वतः अन्नदान वा श्रमदानातून मदत करत आहेत. काहीजण आर्थिक मदत करत आहेत

दहिवडी : माजी आयुक्त तानाजी सत्रे व त्यांच्या बंधूंनी आपल्या आईच्या (कै.) अनुसया विठ्ठल सत्रे यांच्या पुण्यतिथीची रक्कम एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. या कृतीतून सत्रे कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

कोरोना आपत्तीत अनेकजण आपापल्या परीने गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण स्वतः अन्नदान वा श्रमदानातून मदत करत आहेत. काहीजण आर्थिक मदत करत आहेत. माजी विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी माणमधील एक हजारांपेक्षा जास्त गरजू कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्याची मदत केली आहे. 

श्री. सत्रे यांच्या मातोश्री अनुसया सत्रे यांची पुण्यतिथी होती. मात्र, ही पुण्यतिथी त्यांचे बंधू पंढरीनाथ सत्रे यांनी गावी सत्रेवाडी (ता. माण) येथे साधेपणाने धार्मिक विधी करून केली. सर्व सत्रे कुटुंबीयांनी मिळून पुण्यतिथीचा खर्च टाळून एक लाख रुपये रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19 ला मदत म्हणून दिली. या मदतीचा धनादेश रामचंद्र सत्रे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. आपल्या या कृतीतून सत्रे कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

कोरोनाप्रश्‍नी महाविकास आघाडीचे सरकार बेफिकीरः खासदार निंबाळकरांची टीका 
 

सातारा जिल्हा प्रशासनाच्या 'त्या' भुमिकेबाबत नागरिकांमध्ये असंतोष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara EX IAS Officer Donated One Lac Ruppees To Chief Minister