50 कुटुंबांना मदत करुन नव दांपत्य संसार वेलीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना विषाणूच्या संकंटामुळे दोन्ही कुटुंबांनी अनावश्‍यक खर्च टाळून समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार नवविवाहित दांपत्याच्या हस्ते जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. 

केळघर (जि.सातारा) : आपल्या लग्नातील अनावश्‍यक खर्चास फाटा देऊन उरलेल्या पैशातून संपूर्ण गावाला मास्क व सॅनिटायझर भेट देऊन आसनी येथील एका नवविवाहित दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आसनी येथील प्राथमिक शिक्षक विश्वनाथ धनावडे व शिक्षिका अलका धनावडे यांचा मुलगा तुषार व केंजळ येथील दशरथ केंजळे यांची कन्या जानकी यांचा विवाह सोहळा आसनी येथे नुकताच झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावर बंधने आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या चौकटीमध्ये आसनीत विवाह झाला. मोजके लोक व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत लग्न झाले. लग्न झाल्यानंतर नवदांपत्य व त्यांच्या कुटुंबीयांनी अनावश्‍यक खर्चास फाटा देऊन संपूर्ण गावासाठी कोरोनाशी लढा देण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. परिसरातील 50 कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे जीवनावश्‍यक साहित्य दोन्ही कुटुंबांकडून देण्यात आले. लग्नपत्रिकेवरही मास्क वापरा कोरोना टाळा, सॅनिटायझरचा वापर करा, असे प्रबोधनपर संदेश टाकले होते. लग्नात आहेर न करता कोरोनाशी लढा देण्यासाठी निधी द्यावा, असे आवाहनही दोन्ही कुटुंबांनी केले.

कोरोना विषाणूच्या संकंटामुळे दोन्ही कुटुंबांनी अनावश्‍यक खर्च टाळून समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार नवविवाहित दांपत्याच्या हस्ते जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले, असे आसनीचे ग्रामस्थ सागर धनावडे यांनी सांगितले.

तब्बल 33 हजार जणांच्या जीवाला धोका?

मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच...

Video : होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Newly Married Couple Distributed Mask