#SaturdayMotivation गरिबांची सेवा करणारा नेत्रदाता

Saturday Motivation of Dr Zanwar
Saturday Motivation of Dr Zanwar

नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांनी नुकतेच 75व्या वर्षांत पदार्पण केले. गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रदीर्घ नेत्रसेवेची दखल घेत अखिल भारतीय सेवाभावी नेत्रतज्ज्ञांच्या (acoin) संघटनेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा लेखाजोखा.
- आप्पा कुलकर्णी

डॉ. झंवर यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यास आणि गुणवत्ता यांचा उत्तम समन्वय साधला. तळेगाव येथील धर्मादाय नेत्ररुग्णालयात त्यांना आठ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांवर उपचार करीत असताना नेत्रसेवेचे बीज त्यांच्या मनात रुजले. डॉ. सतीश देसाई यांच्या प्रेरणेने पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली. त्यांनी क्रीडा वैद्यक संघटनेचीही स्थापना केली. शिवाजीनगरच्या दळवी रुग्णालयात छोटे शिबिर, ध्यान शिबिर या संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊन त्यातून दरमहा एक याप्रमाणे पंचवीस वर्षांत 250 मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे यशस्वीरीत्या पार पाडली आहेत.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी लहान मुला-मुलींमध्ये असलेल्या तिरळेपणाच्या आजारावर लक्ष केंद्रित केले. गेली 35 वर्षे या अवघड शस्त्रक्रियांची मोफत शिबिरे ते राज्यात घेत आहेत. आतापर्यंत त्यांनी तिरळेपणाची 210 शिबिरे आणि 170 मोफत शस्त्रक्रिया शिबिरे यशस्वीरीत्या पार पाडली आहेत.
आजही ही शिबिरे चालू असून आतापर्यंत 25000हून अधिक तिरळ्या मुलामुलींना मार्गदर्शन व 5300 शस्त्रक्रिया त्यांनी टीमच्या मदतीने पार पाडल्या. त्यांच्या या कामाची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये तीन वेळा नोंद झाली आहे. तसेच "आशिया बुक ऑफ रेकॉर्डस', "इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये नोंद झाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्रतज्ज्ञ संघटनांच्या परिषदांमधील त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामाचे सादरीकरण केले आहे. 50 एनजीओच्या सहकार्याने त्यांनी 1100 नेत्रशिबिरे घेतली. त्यांनी नेत्र आरोग्यावर जवळपास शंभर लेख लिहिले असून दीडशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. आजपर्यंत पंचवीस पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. दिल्लीच्या विश्‍वकर्मा विद्यापीठाने नेत्रसेवेच्या कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्‍टरेट दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com