आईच्या स्वप्नांना स्नेहाने दिले बळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

सावंतवाडी - धाकोरा सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. घरकाम करणाऱ्या आईला तिच्या कामात मदत करीत स्नेहा मुळीक या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत (८९.८२ टक्के) मिळवत भरीव यश मिळविले. 

सावंतवाडी - धाकोरा सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. घरकाम करणाऱ्या आईला तिच्या कामात मदत करीत स्नेहा मुळीक या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत (८९.८२ टक्के) मिळवत भरीव यश मिळविले. 

आजगावच्या विद्या विहार इंग्लिश स्कूलमधून (८९.८२ टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळवून सर्वानाच आश्‍चर्याचा सुखद धक्‍का देणाऱ्या स्नेहा मुळीकचे कौतुक करावे तेवढे थोडेच. धाकोरा हे गाव दुर्गम भागात आहे. अशा भागातून स्नेहाची आई शहरात ३० किलोमीटरवर येऊन शहरातील एका डॉक्‍टरांच्या घरात घरकाम करते. आपल्या दोन्ही मुलीला खूप शिकवून मोठ्या पदावर न्यावे ही तिची इच्छा. याची जाणीव कायम मनात ठेवून आपल्या आईलाही तेवढीच मोठी साथ देण्याचे काम स्नेहाने केले. धाकोरा ते आजगाव अशी चार ते पाच किलोमीटरची दरोज पायपीट करावी लागे. सायकल घेणे परवडत नसतानाही शिक्षण घेण्यासाठी कोणतेही खाजगी शिकवणी वर्गाचे शिक्षण न घेता वर्गातील इतर विद्यार्थ्याना मागे टाकत तिने प्राप्त केलेल्या गुणांचे कौतूक शिक्षक वर्गाने केले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत गोळे व आजगाव केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी तिला बक्षीस देऊन अभिनंदन केले. आपल्याला अजूनही खूप मोठे यश मिळवायचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपल्या यशात आपल्या आईचे खूप परिश्रम आहे. म्हणूनच हे यश मिळवू शकले, असे स्नेहा म्हणते. सध्यस्थितीत तिने अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिच्या पुढील शिक्षणाला मदतीसाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. गरज आहे ती समाजाने पुढे येण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawantwadi news ssc