दिवाळीपुरते का होईना आम्हाला घरी न्या; वृद्धांच्या डोळ्यात जाणवली भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीपुरते का होईना आम्हाला घरी न्या; वृद्धांच्या डोळ्यात जाणवली भावना

दिवाळीपुरते का होईना आम्हाला घरी न्या; वृद्धांच्या डोळ्यात जाणवली भावना

सातारा : आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी आपल्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आपले जीवन तेजोमय केले अशा जन्मदात्यांना त्यांचे कुलदीपकच विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवत नाहीत. दिवाळीच्या पर्वावर तरी आम्हाला घरी न्या, अशी आर्त हाक मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांच्या डोळ्यात दिसून आली.

कोरेगाव इनरव्हील क्लबच्या वतीने अध्यक्षा शशिकला, सचिव नलिनी बर्गे, खजिनदार सुनीता मोरे यांनी दिवाळीनिमित्त महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृद्धाश्रमात फराळ आणि साहित्य वाटप केले. त्यावेळी या वृद्धांशी संवाद साधताना त्यांच्यात किमान दिवाळीला तरी आपले नातेवार्इक आपल्याला घरी घेऊन जातील, अशी आस लागल्याचे प्रकर्षाने जाणवले. मातोश्री वृद्धाश्रमात सध्या सुमारे २७ पुरुष-स्त्री वृध्द वास्तव्यास आहेत. या वृद्धाश्रमात असलेल्या या आबालवृध्दांशी दरवर्षी इनरव्हील क्लबच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात येते. गतवर्षी कोरोनाचे संकट असतानाही क्लबच्या वतीने येथील वृध्दांबरोबर संवाद साधत दिवाळीचा फराळ, कपडे, साड्या वाटून दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी फराळ वाटप केले. या वेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वृध्दांशी संवाद साधताना त्यांच्या पूर्वायुष्याबाबत आपुलकीने माहिती घेतली. वृध्दांनाही आपली कोणीतरी आपुलकीने चौकशी करत असल्याचे जाणवल्याने त्यांना आपण आपल्या पूर्वायुष्यात असल्याची अनुभूती मिळाली.

हेही वाचा: रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

दरम्यान, दिवाळीच्या वसुबारसेनिमित्त वृद्धाश्रमात असलेल्या गार्इसाठी क्लबच्या अध्यक्षा ओसवाल यांनी वैयक्तिरित्या एक पोते पेंड वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकांकडे सुपूर्द केली. त्यामुळे व्यवस्थापनाने फराळ, पेंडीबाबत क्लबचे आभार मानले.

Web Title: Take Us Home For Diwali Feelings In The Eyes Of The Elderly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Diwali
go to top