esakal | कोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkyatara Hospital

कोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन

sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (सातारा) : माण देशी फाउंडेशन व सिप्ला कंपनी यांच्यामार्फत नंदकुमार लिंगे यांच्या स्मरणार्थ फिलिप्स कंपनीचा व्हेंटिलेटर सातारा येथील अजिंक्‍यतारा हॉस्पिटलमध्ये देण्यात आला. या वेळी माण देशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, अजिंक्‍यतारा हॉस्पिटलचे डॉ. सचिन गुरव, कच्छी कन्ट्रक्‍शनचे हमीद कच्छी, अभय केळकर, कुशल भागवत, शुभम लिंगे, शरद माने आदी उपस्थित होते.

या वेळी प्रभात सिन्हा म्हणाले, "कोरोनाच्या साथीत गरज पडेल तेथे माण देशी फाउंडेशनकडून शक्‍य तेवढी मदत आम्ही नक्कीच करू. आपण सगळे मिळून या परिस्थितीमधून लवकरच बाहेर पडू. माण देशी फाउंडेशनकडून व माण देशी रेडिओकडून कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. म्हसवड येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना पोषक आहार म्हणून खजूर, सफरचंद, मोसंबी व दररोज प्रत्येकी दोन अंडी दिली जात आहेत.''

जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'

माण देशी फाउंडेशन व सरकारच्या माध्यमातून गोंदवले खुर्द येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. माण देशी फाउंडेशनकडून जिल्ह्यातील कोविड रुग्णांना हवी ती मदत केली जात आहे. (कै.) नंदकुमार लिंगे हे माण देशी फाउंडेशन व माण देशी महिला बॅंक परिवारातील होते. त्यांच्या स्मरणार्थ फिलिप्स कंपनीचा व्हेंटिलेटर साताऱ्यातील अजिंक्‍यतारा हॉस्पिटलमध्ये देण्यात आला.

Edited By : Balkrishna Madhale

loading image